Home /News /sport /

पंजाबविरुद्ध मॅचपूर्वी लखनऊला धक्का, टीमचे CEO कार अपघातात जखमी

पंजाबविरुद्ध मॅचपूर्वी लखनऊला धक्का, टीमचे CEO कार अपघातात जखमी

lucknow super giants

lucknow super giants

आयपीएल 15 व्या सीझनमधील (IPL 2022) 42 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज (pbks vs lsg) यांच्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे (MCA) येथे खेळवण्यात येत आहे. अशातच या मॅचपूर्वी लखनऊ संघाला मोठा धक्का बसला आहे. टीमचे सीईओ रघु अय्यर कार अपघातात जखमी झाले आहेत.

पुढे वाचा ...
    पुणे, 29 एप्रिल: आयपीएल 15 व्या सीझनमधील (IPL 2022) 42 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज (pbks vs lsg) यांच्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे (MCA) येथे खेळवण्यात येत आहे. अशातच या मॅचपूर्वी लखनऊ संघासोबत दुखद घटना घडली आहे. टीमचे सीईओ रघु अय्यर कार अपघातात जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सामना पाहण्यासाठी ते संघासोबत निघाले होते. त्याच्यासोबत आणखी दोन लोक होते. टीमचे सीईओ रघु अय्यर हे एका रस्ता अपघातात जखमी झाले आहेत. रघू अय्यर हे मुंबईहून पुण्याला लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या बससोबत कारमधून जात असताना वाटेत कारला अपघात झाला. अय्यर व्यतिरिक्त, संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरचा पीएस गौरव अरोरा आणि आणखी एक व्यक्ती या अपघातात जखमी झाले, परंतु आता सर्वजण सुरक्षित आहेत. लखनऊ सुपर जायंट्सचा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील, लखनऊ सुपर जायंट्सने या हंगामात आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत आणि पाच जिंकले आहेत.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Lucknow Super Giants, Punjab kings

    पुढील बातम्या