Home /News /sport /

केवळ 4 ओव्हरमध्ये एकट्या स्पिनरने संपूर्ण टीमला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

केवळ 4 ओव्हरमध्ये एकट्या स्पिनरने संपूर्ण टीमला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

Jeffrey Vandersay

Jeffrey Vandersay

लंका प्रीमियर लीग (Lanka premier league)मध्ये 31 वर्षीय लेग-स्पिनरने कमालीची खेळी खेळली.

  कोलंबो, 18 डिसेंबर: लंका प्रीमियर लीग (Lanka premier league)मध्ये 31 वर्षीय लेग-स्पिनरने कमालीची खेळी खेळली. जेफ्री वँडरसेने (Jeffrey Vandersay) कोलंबो स्टार्ससाठी खेळताना टी20 लीगच्या एका मॅचमध्ये 6 विकेट घेतल्या आणि संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले. कोलंबोने कँडी वारियर्सवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. वंडर्सने आंतरराष्ट्रीय टी 20 करिअरमध्ये आत्तापर्यंत केवळ 6 विकेट घेतल्या आहेत. आणि त्याने स्वतःच्याच टी 20 आंतरराष्ट्रीय कामगिरीशी बरोबरी केली. 24 मधील 16 बॉलवर विरोधी टीमला एकही रन काढू दिली नाही. त्याचे हे टी 20 करिअरमधील बेस्ट प्रदर्शन आहे. कोलंबोच्या विजयामध्ये श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज जेफ्री वँडरसेने महत्त्वाची भूमिका बजावली. जेफ्रीने 4 षटकात 25 धावा दिल्या आणि 6 विकेट्स काढल्या. विशेष म्हणजे जेफ्रीच्या संपूर्ण कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने श्रीलंकेसाठी 10 टी-20 सामने खेळले आहेत आणि त्या 10 सामन्यांमध्ये तो फक्त 6 विकेट घेऊ शकला आहे आणि आता फक्त 4 षटकात इतक्या विकेट्स घेता आल्या आहेत.
  कोलंबो स्टार्सने कँडी वारियर्ससमोर 183 रनांचा डोंगर उभा केला होता. वंडर्सने संघाला सुरवातीलाच 2 झटके दिले. त्यानंतर रवा बोपाराने 47 धावा करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. यानंतर रवी बोपाराने 47 धावा करत संघाची धुरा सांभाळली. एका वेळी स्कोअर 2 गडी बाद 82 अशी होती. कँडी वॉरियर्सने शेवटच्या 8 विकेट 42 धावांत गमावल्या. 6 खेळाडूंना दहाचा आकडा पार करता आला नाही. वँडरसेने 4 षटकात एका मेडनसह 25 धावा दिल्या आणि 6 बळी घेतले. सिकुगे प्रसन्नालाही 2 बळी मिळाले. संघ 124 धावांवर बाद झाला.

  परेरा आणि चंडिमल यांनी आक्रमक खेळी खेळली

  तत्पूर्वी, कोलंबो स्टार्सने प्रथम खेळताना 20 षटकांत 6 बाद 182 धावा केल्या. कुसल परेराने अर्धशतकी खेळी खेळली. त्याने 38 चेंडूत 58 धावा केल्या. 6 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय दिनेश चंडिमलने 29 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. 3 चौकार आणि 2 षटकार मारले. दुसरीकडे, धनंजय डी सिल्वाने 28 चेंडूत 40 धावांची चांगली खेळी खेळली. 7 चौकार मारले.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Cricket news

  पुढील बातम्या