कराची, 25 नोव्हेंबर : आयपीएल आणि पाकिस्तान प्रीमिअर लीगनंतर आता लंका प्रीमिअर लीगला सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी LPLच्या अडचणी वाढल्या आहे. याआधी काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, तर आता चक्क एक संघाच्या कर्णधारानंच आपली फ्लाइट चुकवली आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं सोमवारी श्रीलंकेला जाणारी फ्लाइट चुकवली. श्रीलंकेमध्ये पहिली लंका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार असून त्यासाठी आफ्रिदी लंकेला जाणार होता, मात्र आता त्याच्या चुकीमुळे त्याला या स्पर्धेतील कमीतकमी दोन सामन्यांना मुकावं लागणार आहे.
गॅले ग्लॅडिएटर्स या फ्रँचायझीचं नेतृत्व करणाऱ्या आफ्रिदीनं स्वत: ट्वीट करत याबाबत माहिती दिली. 40 वर्षीय ऑलराऊंडरने ट्विट केले की, " मी माझी कोलंबोला जाणारी प्लाइट मिस केली आहे. काळजी करण्याची गरज नाही, मी गॅले ग्लॅडिएटर्सकडून एलपीएलमध्ये खेळण्यासाठी लवकरच पोहचणार आहे. माझ्या संघासोबत खेळण्यासाठी मी फार उत्सुक आहे."
वाचा-ICC Player Of The Decade साठी कॅप्टन कोहलीसमोर 'या' दिग्गज खेळाडूंचं आव्हान!
Missed my flight to Colombo today morning 😕
Nothing to worry, I'll be reaching soon to take part in the LPL for Galle Gladiators. Look forward to joining my teammates
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) November 23, 2020
त्याच्या अनुपस्थितीत कॅंडी टस्कर्स आणि कोलंबो किंग्ज यांच्यात या नव्या लीगच्या पहिल्याच सिझनचा पहिला सामना झाल्यानंतर, त्याची टीम गॅले ग्लॅडीएटर्स 27 नोव्हेंबरला जाफना स्टॅलियन्सला टक्कर देणार आहे.
वाचा-...तरच रोहित-इशांत खेळू शकतात कसोटी मालिका, निर्णय आता ऑस्ट्रेलियाच्या हाती
आफ्रिदीच्या या ट्विटवर त्याच्या देशातील अनेक चाहत्यांनी या क्रिकेटपटूला पाठिंबा दर्शविला आणि ते म्हणाले की आम्ही पाकिस्तानी खेळाडूला अक्शनमध्ये बघण्यास उत्सुक आहोत. मात्र आफ्रिदीला ट्रोलही करण्यात आले आहे.
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि पाकिस्तानचा विकेटकीपर-फलंदाज सरफराज अहमद यांनी खासगी कारणांसाठी आपण उपलब्ध नसल्याचं सांगितल्यानंतर शाहिद आफ्रिदीला गॅले ग्लॅडीएटर्सचा कर्णधार म्हणून नेमण्यात आलं. आफ्रिदीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार भानुका राजपक्षे पहिल्या काही सामन्यांमध्ये ग्लॅडिएटर्सचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे.
वाचा-ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेट्रो लूकमध्ये दिसणार भारतीय संघ, धवननं शेअर केला PHOTO
या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान सुपर लीग प्ले-ऑफमध्ये मुलतान सुलतान्सकडून दोन सामने खेळल्यानंतर 40 वर्षीय आफ्रिदी एलपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी श्रीलंकेला रवाना झाला आहे. पीएसएलमध्ये त्याने दोन सामन्यांत तीन विकेट्स घेतल्या. आफ्रिदी श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर स्पर्धेच्या बायो-सिक्योर बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याला तीन दिवसांच्या विलगीकरण प्रक्रियेतून जावं लागणार आहे.