The Ashes : ऑस्ट्रेलियाला मोठा दणका! धक्कादायक अपघातानंतर स्टीव्ह स्मिथ संघाबाहेर

अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 06:06 PM IST

The Ashes : ऑस्ट्रेलियाला मोठा दणका! धक्कादायक अपघातानंतर स्टीव्ह स्मिथ संघाबाहेर

लंडन, 18 ऑगस्ट : अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळं स्टीव्ह स्मिथला मैदान सोडावं लागलं, त्यानंतर पुन्हा तो मैदानात उतरला. मात्र आता लॉर्ड्स मालिकेतून स्टीव्ह स्मिथ बाहेर पडला आहे. 80 धावांवर खेळत असताना आर्चरचा वेगवान चेंडू स्मिथच्या मानेवर आदळला. तेव्हा तो मैदानावरच कोसळला. त्यानंतर मार्कस लाबुशेनला संघात सामिल करण्यात आहे. आयसीसीच्या बदललेल्या नियमानुसार पहिल्यांदाच क्रिकेटपटूच्या रिप्लेसमेंटचा वापर करण्यात आला.

दुसऱ्या कसोटीत स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडनं जोफ्रा आर्चरला संघात घेतलं. जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्यानं स्मिथ बाद झाला नाही पण जखमी होऊन त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. स्टिव्ह स्मिथ 80 धावांवर खेळत असताना आर्चरचा उसळता चेंडू थेट स्मिथच्या मानेवर आदळला. त्यावेळी स्मिथ मैदानावर कोसळताच सर्व खेळाडूंसह प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.

सकाळी बेशुध्द अवस्थेत उठला स्मिथ

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीनं, डोक्याला चेंडू लागल्यानंतर सकाळी स्मिथ उठला तेव्हा तो बेशुध्द अवस्थेत होता. त्यानंतर पुन्हा त्याची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला सामन्याच्या बाहेर करण्यात आले. दरम्यान मार्कस लाबुशेनला संघात सामिल करण्यात आले आहे. आयसीसीच्या बदललेल्या नियमानुसार पहिल्यांदाच क्रिकेटपटूच्या रिप्लेसमेंटचा वापर करण्यात आला.

वाचा-'स्मिथला अजून टार्गेट केलं तर आश्चर्य नाही', पाँटिंगला झाली 2005 ची आठवण

Loading...

तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार स्मिथ

स्मिथला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळं तो, तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार की नाही याबाबत साशंकता आहे. गुरुवारपासून तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. स्मिथ वर्ल्ड कपपासून फॉर्ममध्ये आहे. त्यानं पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतकी खेळी केली होती.

वाचा-VIDEO : तो वेदनेनं विव्हळत असताना आर्चर हसत होता, चाहते भडकले

स्मिथच्या हेल्मेटवर नव्हता नेक गार्ड

दुसऱ्या डावात स्मिथला लवकर बाद करण्यासाठी इंग्लंडनं आर्चरला संघात घेतलं. तरीही स्मिथ मैदानावर टिकून होता. स्मिथच्या 70 धावा झाल्या असताना आर्चरचा एक चेंडू दंडावर आदळला होता. त्यानंतर 80 धावांवर खेळत असताना वेगवान चेंडू स्मिथच्या मानेवर आदळला. तेव्हा स्मिथ मैदानावर कोसळला. दरम्यान यावेळी त्याच्या हेल्मेटवर नेक गार्ड नसल्यामुळं त्याला गंभीर दुखापत झाली.

वाचा-आर्चरचा चेंडू लागून स्मिथ मैदानावरच कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

तीन भारतीय महिला पाकिस्तानला ठरल्या भारी, हा VIDEO पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...