मतदान करा आणि पेट्रोल, दागिन्यांच्या खरेदीत मिळवा भरघोस सूट!

मतदान केल्यानंतर पेट्रोलच्या दरात मिळेल सूट, वाचा आणखी कोणत्या गोष्टीत मिळेल सूट

  • Share this:

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात 18 राज्यांमध्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशात 91 लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिलला मतदान होार आहे. यात मतदान जनजागृतीसाठी वेगवेगळ्या प्रकारे निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी घोषणा केली आहे की, मतदानादिवशी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल 50 पैसे स्वस्त मिळेल. यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.

ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी घोषणा केली आहे की, मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई पेट्रोल पंपावर दाखवल्यानंतर खरेदीत 50 पैसे प्रति लीटर सूट मिळेल.

केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनुप खन्ना यांनी मतदान करणाऱ्यांना औषधांच्या खरेदीवर 10 टक्के सूट दिली जाईल असं सांगितलं आहे.

मतदान करणाऱ्यांमध्ये कोणी आजारी असतील तर त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी आणि उपचार केले जातील. ही सुविधा नोएडातील फेलिक्स हॉस्पिटल, प्रकाश हॉस्पिटलमध्ये मिळेल.

सिल्चर लोकसभा मतदार संघात सोन्याचे दागिन्यांच्या निर्मिती खर्चात 15 टक्के सूट देण्यात येत आहे. तर अनेक हॉटेल्समध्ये 10 ते 15 टक्के सूट देण्याचं जाहीर केलं आहे. यासाठी मतदान करण्याची अट असेल.

विशेष म्हणजे ही ऑफर एक दिवसासाठी नसून 18 आणि 19 एप्रिल अशी दोन दिवस असेल. याचा लाभ घेण्यासाठी बोटावर मतदानानंतर लावण्यात आलेली शाई दाखवावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 11:18 AM IST

ताज्या बातम्या