CWG Games 2018 LIVE : भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास

CWG Games 2018 LIVE : भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास

21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने विजयाने सुरुवात केलीय. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने पहिल्या पदकाची कमाई केली आहे. पी. गुरुराजा यांनं 56 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावलं आहे.

  • Share this:

05 एप्रिल : 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने विजयाने सुरुवात केलीय. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने पहिल्या पदकाची कमाई केली आहे. पी. गुरुराजा यांनं 56 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावलं आहे. गुरुराजा यांने 249 किलो वजन उचलत भारताच्या खात्यात पहिलं पदक जमा केलं आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावलं आहे. वेटलिफ्टर मिराबाई चानूने एका मागोमाग क्लीन एंड जर्क प्रकारात एक स्नॅचच्या तिन्ही प्रयत्नात राष्ट्रकुल स्पर्धा विक्रम मोडत स्वतःची सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली (८६ किलो). जुना विक्रम ७७ किलोचा होता.

मलेशियाच्या मुहम्मद अझहर अहमद यांने २६१ किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकावले तर श्रीलंकेच्या अशून चतुरंगा लकमल यांने २४८ किलो वजन उचलत कांस्य पदकाची कमाई केली आहे.

गुरू राजा यांनी 2010मध्ये वेटलिफ्टिंगला सुरूवात केली. वॉमनवेल्थ सिनिअर वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या गुरूराज यांनी 2016मध्ये पेनंग स्पर्धेत 249 किलो वजन उचललं होतं. 2016च्या शेवटी झालेल्या साऊन एशियन गेम्समध्ये गुरू राजा यांनी सुवर्ण पदक मिळवलं होतं.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे २१ व्या कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात झालेली आहे. कालच्या दिवशी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

 

First published: April 5, 2018, 11:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading