Women's World Cup: भारत-पाकिस्तान आमने-सामने

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2017 11:25 PM IST

Women's World Cup: भारत-पाकिस्तान आमने-सामने

संपूर्ण स्कोअर पाहा इथं

2 जुलै : नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानकडून सपाटून मार खावा लागला. यामुळे लाखो भारतीय क्रिकेट प्रेमींची घोर निराशा झाली. पण क्रिकेटच्या मैदानात पुन्हा हे दोन संघ एकमेकांविरोधात दिसणार आहेत.

पण यावेळी फरक फक्त इतकाच असेल, की यावेळी भारतीय पुरुष संघाऐवजी महिला क्रिकेट संघ पाकिस्तानविरोधात लढणार आहे. सध्या महिला विश्वचषकाचे सामने इंग्लंडमध्ये सुरु असून, आयसीसीच्या सर्वात मोठ्या टूर्नामेंटमध्ये भारताच्या  महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केलीय. महिला वर्ल्डकपमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान दरम्यान डर्बीच्या काऊंटी ग्राऊंडवर क्रिकेटचा सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघात 2005 ते 2017 दरम्यान 9 एकदिवसीय सामने झाले आहेत. यात पाकिस्तानचा चांगलाच पराभव झालाय . त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात काय होईल याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय. सध्या मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं आयसीसीच्या या टूर्नामेंटमध्ये चमकदार कामगिरी केलीय. त्यामुळे आजच्या सामन्यातही तिचा हाच संयम पाहायला मिळेल अशी क्रिकेटप्रेमींना आशा आहे.

तसंच इंग्लंड येथे सुरु असलेल्या महिला विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत सांगलीची स्मृती मंधाना अप्रतिम खेळत आहे. २५ वी वनडे खेळणाऱ्या स्मृतीनं, वेस्ट इंडीज विरोधात शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील हे तिचे दुसरे शतक होते. मागील वर्षी ऑस्ट्रोलीया विरोधात तिने शतक केले होते. तिच्याकडूनही आज देशाला अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 09:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...