IND vs AUS : अटीतटीच्या लढतीत अखेरच्या चेंडूवर आॅस्ट्रेलियाचा भारतावर विजय

IND vs AUS : अटीतटीच्या लढतीत अखेरच्या चेंडूवर आॅस्ट्रेलियाचा भारतावर विजय

भारताने दिलेलं 127 धावांचं आव्हान आॅस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर 3 गडी राखून पूर्ण केलं.

  • Share this:

24 फेब्रुवारी : आॅस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 सामन्यात दमदार खेळी करत अटीतटीचा सामना खिश्यात घातला आहे. भारताने दिलेलं 127 धावांचं आव्हान आॅस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर 3 गडी राखून पूर्ण केलं. पहिल्याच सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारताला आपल्या मायभूमीत पराभूत केलं.

भारत आणि आॅस्ट्रेलियादरम्यान पहिला टी-20 सामना विशाखापट्टणम इथं खेळवण्यात आला होता. आॅस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने निर्धारित 20 षटकात 126 धावा केल्या होत्या. 127 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आॅस्ट्रेलियन संघाने सावध सुरूवात केली. परंतु, दुसऱ्या आणि तिसऱ्याच षटकार कर्णधार एरॉन फिंच आणि मार्कस स्टोइनिस झटपट बाद झाले. त्यानंतर आलेल्या ग्लेन मैक्सवेल आणि पीटर हैंड्सकॉम्बने टीमची कमान सांभाळली. मॅक्सवेलने 43 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार लगावत टीमच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. पण, मॅक्सवेल 56 तर स्टोइनिस 13 धावा करून बाद झाल्यानंतर भारताची विजयाची आशा पल्लवीत झाली. परंतु, अखेरच्या चेंडूपर्यंत आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी झुंज दिली आणि विजय मिळवला. भारताकडून जसप्रीत ब्रुमराने सर्वाधिक 3 गडी बाद केले तर यजुवेंद्र चहल आणि क्रुणाल पांड्याने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

भारताची इनिंग

आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताला पहिली फलंदाजी करण्यासाठी आॅस्ट्रेलियाने आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात निराशजनक राहिली. तिसऱ्याच षटकात रोहित शर्मा 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने फटकेबाजी करत भारताचा धावफलक उंचावत ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, 9 षटकात विराट कोहली 24 धावा करून बाद झाला. केएल राहुलने 36 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार लगावत 50 धावा करून बाद झाला. ओपनिंग जोडी माघारी परतल्यानंतर मधली फळी पुरती ढेपाळली. ऋषभ पंत 3, दिनेश कार्तिक 1, क्रुणाल पांड्या 1, उमेश यादव 2 धावा करून स्वस्तात बाद झाले. महेंद्र सिंग धोनीने चिवट झुंज देत नाबाद 29 धावा केल्यात. भारताने निर्धारित 20 षटकात 7 बाद 126 धावा केल्या होत्या. टी-20 सामन्यात आॅस्ट्रेलियाने विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

=============

First published: February 24, 2019, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading