भारत-द.आफ्रिका कसोटी : तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबवला

भारत-द.आफ्रिका कसोटी : तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबवला

विशेष म्हणजे टीम इंडियाच्या खेळाडूंनाही चेंडू लागून दुखापत झाली पण खेळ थांबवला नाही.

  • Share this:

26 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसरा कसोटी सामना अचानक नाट्यमय पद्धतीने थांबवण्यात आलाय. भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 247 धावा केल्या आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर 241 धावांचं लक्ष्य आहे.

सलग दोन कसोटी गमवल्यानंतर भारतासाठी तिसरी कसोटी महत्वाची आहे. मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय टीम विशेष अशी कामगिरी करू शकली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये अवघा संघ 247 धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिका विजयी टार्गेट घेऊन मैदानात उतली. दक्षिण आफ्रिकनं टीमने 17 धावा 1 बाद अशी स्थिती झालीये. मात्र, आठव्या ओव्हरमध्ये बुमराहचा उसळता चेंडू डीन एल्गरच्या हेल्मेटला लागला. त्यामुळे डाॅक्टरांच्या टीमने मैदानावर येऊन तपासणी केली. त्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला. पण आफ्रिकनं खेळाडूंनी खेळण्यास उत्साह दाखवला नाही. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या खेळाडूंनाही चेंडू लागून दुखापत झाली पण खेळ थांबवला नाही.

एल्गरच्या हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर दोन्ही अंपायरनी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही टीमच्या कर्णधारांना बोलावून घेतलं आणि चर्चा केली. त्यानंतर आजच्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 241 धावांचं लक्ष्य आहे. टीम इंडिया तिन कसोटी सामन्यात 0-2 पिछाडीवर आहे.

First published: January 26, 2018, 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading