भारताकडून बांग्लादेशची 'शिकार',आता पाकसोबत 'मैदान-ए-जंग'

भारताकडून बांग्लादेशची 'शिकार',आता पाकसोबत 'मैदान-ए-जंग'

आज चॅम्पियन्स ट्राॅफीच्या मॅचमध्ये भारताचा मुकाबला बांग्लादेशशी सुरू आहे.

  • Share this:

15 जून : रोहित शर्माचे शानदार शतक आणि विराट कोहलीची झुंझार खेळीच्या बळावर टीम इंडियाने बांगला टायगरची ‘शिकार' केलीये. २६५ धावांचं आव्हान टीम इंडियाने ४१ व्या ओव्हरमध्येच पूर्ण केलंय. आता रविवारी पारंपारिक कट्टर स्पर्धक पाकिस्तानसोबत ‘मैदान-ए-जंग' अंतिम सामना रंगणार आहे.

आज चॅम्पियन्स ट्राॅफीच्या मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. बांग्लादेश कर्णधार मश्रफी मुर्तझा आणि तस्किन अहमद यांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे बांगलादेशने दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतासमोर २६५ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

बांगलादेशने दिलेल्या २६५ धावांचं आव्हान भारत कसं पेलणार अशी उत्सुक्ता लागून होती. शिखर धवन आणि रोहित शर्माने सावध सुरूवात केली. १० व्या ओव्हरपर्यंत एकही विकेट न जाऊ देता दोघांनी रनरेट वाढता ठेवला. मात्र ४६ रन्सवर आऊट झाला. ४ रन्सने धवनचं अर्धशतक हुकलं. 34 चेंडून ७ चौकार आणि १ षटकार लगावला.

 

शिखर धवननंतर कर्णधार विराट कोहलीने साजेशीर खेळी केली. रोहित शर्माला साथ देत टीमला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. रोहित शर्माने बांगलादेशच्या बॉलर्सची धुलाई करत १२९ चेंडूमध्ये नाबाद १२३ रन्स केले यात १५ चौकार आणि १ षटकारचा समावेश आहे. तर विराट कोहलीने ७८ चेंडूमध्ये नाबाद ९६ रन्स केले. यात १५ चौकारांचा समावेश आहे. विराटचंही ४ रन्सने शतक हुकलं असलं तरी त्याने रेकॉर्डब्रेक ८००० हजार धावांचा टप्पा पार केला. हिटम्ॉन रोहित शर्मा सामनावीर ठरला.

बांग्लादेशची इनिंग

सामन्याच्या सुरुवातीला काही वेळ ढगाळ वातावरणाचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला दणके दिले. सलामीवीर सौम्य सरकार भोपळाही न फोडता तंबूत परतला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सब्बीर रेहमानने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र फटकेबाजी करण्याचा नादात तो देखील जाडेजाच्या हाती झेल देऊन बाद झाला. मात्र यानंतर सलामीवर तमिम इक्बाल आणि यष्टीरक्षक मुश्फिकुर रहिम यांनी बांगलादेशचा डाव सावरला. या दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची भागिदारी केली.

भारतीय गोलंदाजांकडून हार्दिक पंड्याचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि केदार जाधव या तिघांनीही बांगलादेशच्या २-२ फलंदाजांना माघारी धाडलं. तर रविंद्र जाडेजाला १ बळी मिळाला.

 

 

भारताची टीम  : विराट कोहली (कप्तान), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंह, महेंद्र सिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार और रविचंद्रन अश्विन

बांग्लादेशची टीम : मशरफे मुर्तज़ा (कप्तान), इमरूल कायेस, महामुदुल्लाह, मेहेदी हसन मिराज, मोसाद्देक हुसैन, मुश्फीकुर रहीम (विकेटकीपर), मुस्ताफीज़ुर रहमान, रूबेल हुसैन, सब्बीर रहमान, शहीफुल हुसैन, शाकिब अल हसन, सौम्य सरकार, सुंजामुल इस्लाम, तमीम इकबाल, तस्कीन अहमद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2017 10:00 PM IST

ताज्या बातम्या