मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /छोटा विराट कोहली.. चिमुकल्याच्या क्रिकेट कौशल्याने भलेभले झाले थक्क!

छोटा विराट कोहली.. चिमुकल्याच्या क्रिकेट कौशल्याने भलेभले झाले थक्क!

छोटा विराट कोहली..

छोटा विराट कोहली..

या लहान मुलाच्या क्रिकेट कौशल्याने त्याला परिसरात 'छोटा विराट कोहली' अशी ओळख मिळाली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    दंतन (पश्चिम मिदनापूर, पश्चिम बंगाल), 25 मार्च : कव्हर ड्राइव्ह असो अथवा स्ट्रेट ड्राइव्ह, एका लहानग्याचं बॅटिंग कौशल्य पाहून सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. या लहान मुलाच्या बॅटिंग स्किल्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'छोटा विराट कोहली' अशी ओळख मिळालेल्या या लहान मुलाने प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. हा मुलगा एखाद्या प्रशिक्षित क्रिकेटरप्रमाणे स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह मारतो. बॉल कोणत्याही दिशेनं आणि कसाही आला तरी तो त्यावर अक्षरशः तुटून पडतो. या लहान क्रिकेटरचं नाव अंकन क्विला असं आहे. वयाच्या अडीच वर्षांपासून त्याचा क्रिकेटकडे ओढा आहे.

    अंकन हा दंतनमधल्या एकतारपूरचा रहिवासी आहे. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्याच्याकडे असलेलं क्रिकेट खेळण्याचं कौशल्य क्रिकेटप्रेमींना भावलं आहे. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे, असं त्याचे कुटुंबीय सांगतात. टीव्हीवर विराट कोहलीचा खेळ पाहिल्यानंतर त्याला क्रिकेटची आवड लागली. अडीच वर्षांचा असल्यापासून क्रिकेटची बॅट पकडण्याची शैली त्याने आत्मसात केली. त्याच्या या कौशल्याने सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला. आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला दंतनच्या कोचिंग सेंटरमध्ये घातले. आठ वर्षांचा अंकन क्विला सध्या दंतनच्या क्रिकेट कोचिंग कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेत आहे.

    अंकनचे वडील कलाचंद क्विला यांचं कापडाचं छोटं दुकान आहे. त्याची आई रुंपा क्विला गृहिणी आहेत. कलाचंद क्विला यांनी सांगितलं, की `लहानपणापासून त्याची क्रिकेटची आवड आमच्या लक्षात आली. तो इतरही खेळ खेळायचा; पण त्याला क्रिकेट विशेष आवडायचं. त्याला बॅट हवी होती आणि त्यासाठी त्याने आमच्याकडे हट्ट धरला होता. आम्ही त्याला बॅट आणून दिल्यावर त्याची क्रिकेटची पॅशन दुपटीने वाढली. त्यानंतर आम्ही त्याला कोचिंगला पाठवण्याचा निर्णय घेतला.`

    वाचा - World Championship : भारताचा दुसरा गोल्डन पंच, स्विटीने 9 वर्षांने पटकावले सुवर्णपदक

    सामान्य कुटुंबातून आलेल्या अंकनची क्रिकेटची आवड आणि त्याचं बॅटिंग कौशल्य पाहून अनेक जण प्रभावित झाले आहेत. अभ्यासासोबतच तो नियमितपणे घरी बॅटिंगचा सराव करतो. त्याला मोठं झाल्यावर विराट कोहलीप्रमाणे नॅशनल टीममध्ये क्रिकेट खेळायचं आहे. यासाठी त्याचे आई-वडील त्याला सर्वतोपरी मदत करत आहेत.

    अंकनचे प्रशिक्षण संजय पात्रा यांना त्याच्याबद्दल खूप आपुलकी आणि विश्वास आहे. `एवढ्या लहान वयात अंकनची क्रेझ आणि क्रिकेटची आवड दुर्मीळ आहे. तो कव्हर ड्राइव्ह आणि स्क्वेअर ड्राइव्ह इतका छान खेळतो, की कधी कधी मलाच धक्का बसतो. दिवसभर तो क्रिकेटचा विचार करत असतो. मला त्याला भारताचा पुढचा विराट कोहली म्हणून बघायचं आहे,` असं संजय पात्रा यांनी सांगितलं. अंकनलाही विराट कोहलीसारखं व्हायचं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Sports, Virat Kohli