News18 Lokmat

IPL 2019 : मुंबईचे ‘हे’ सामने सात होणार घरच्या मैदानावर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबईचे सामने मुंबईच्या बाहेर होण्याची शक्यता होती. मात्र बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुंबईला आपल्या घरच्या मैदानावरच सामने खेळता येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 08:13 PM IST

IPL 2019 : मुंबईचे ‘हे’ सामने सात होणार घरच्या मैदानावर

मुबंई, 19 मार्च: आयपीएलच्या 12व्या हंगामाच्या सुरुवातीच्या काही सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. मात्र अखेर मंगळवारी IPLच्या अधिकृत वेबसाईटने साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर केलं. 23 मार्चला पहिला सामना चेन्नई आणि बंगळुरु यांच्यात होणार असून दुसरा सामना मुंबई-दिल्ली यांच्यात होणार आहे. तर, प्रत्येक संघाला सात सामने आपल्या घरच्या मैदानावर खेळता येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो वानखेडेवर जाऊन सामने पाहण्यासाठी तयार रहा.

वाचा- IPL 2019 : अखेर आयपीएलच्या साखळी फेरीचं वेळापत्रक जाहीर

मुंबई इंडियन्स संघाचे होम ग्राऊंड मुंबईतील वानखेडे स्टेडियम आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबईचे सामने मुंबईच्या बाहेर होण्याची शक्यता होती. मात्र बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुंबईला आपल्या घरच्या मैदानावरच सामने खेळता येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई इंडियन्सचे वानखेडेवर सामने कधी?

24 मार्च : मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, वानखेडे (रात्री. 8)

3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, वानखेडे (रात्री. 8)

10 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, वानखेडे (रात्री. 8)

13 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, वानखेडे (दुपारी.4)

15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वानखेडे (रात्री. 8)

2 मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, वानखेडे (रात्री. 8)

5 मे : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, वानखेडे (रात्री. 8)


VIDEO : मोदी-शहा सत्तेबाहेर गेलेच पाहिजे, राज ठाकरेंचं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...