मेस्सी की रोनाल्डो? फीफाने जाहीर केला सर्वात मोठा पुरस्कार

गेल्या दहा वर्षात 2018 चा अपवाद वगळता फीफाच्या प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात स्पर्धा आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 11:37 AM IST

मेस्सी की रोनाल्डो? फीफाने जाहीर केला सर्वात मोठा पुरस्कार

मिलान, 24 सप्टेंबर : जगातील दिग्गज फुटबॉलपटू अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सीने पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिव्हरपूलच्या वर्जिल वान यांना मागे टाकत सहाव्यांदा फीफा प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला. त्याने रोनाल्डोच्या पाचवेळा हा पुरस्कार पटकावण्याच्या कामगिरीलाही मागे टाकलं. मेस्सीनं मागच्या हंगामात बार्सिलोनासोबत स्पॅनिश लीगचा पुरस्कार पटकावला होता. तर सर्व स्पर्धांमधील 58 सामन्यात 54 गोल नोंदवले होते.

मेस्सीनं 2015 मध्ये फीफा प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला होता. याआधी त्यानं 2009, 2010, 2011, 2012 आणि 2015 मध्ये पुरस्कारावर नाव कोरलं होतं. गेल्या दहा वर्षांत फीफा प्लेअर ऑफ द इयर पुरस्काराच्या स्पर्धेत मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यातच रस्सीखेच सुरू आहे. 2007 मध्ये ब्राझीलच्या काकाने हा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत 2018 चा अपवाद वगळता रोनाल्डो आणि मेस्सी यांनीच हा पुरस्कार पटकावला आहे. 2018 मध्ये क्रोएशियाच्या लुका मॉड्रिकला प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघ वर्ल्ड कप फायनलपर्यंत पोहचला होता. अंतिम सामन्यात फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागला होता.

महिला फूटबॉलपटूंमध्ये मेगन रेपीनो प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला. मेगनने महिला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेला विदेतेपद मिळवून दिलं होतं. पुरस्कार मिळाल्यानंतर ती म्हणाली की, भावना व्यक्त करण्यासाठी तिच्याकडे शब्द नाहीत. हे वर्ष खूपच चांगलं होतं.

VIDEO : नॅशनल हायवेवर तरुण करत होता असे भयंकर स्टंट; आता पोलीस घेतायत शोध

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2019 11:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...