मुंबई, 23 जानेवारी : ओमानमध्ये सध्या लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा (Legends League Cricket) सुरू आहे. या स्पर्धेत ऐकेकाळी जागतिक क्रिकेट गाजवणारे दिग्गज क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना मैदानात पाहणे ही फॅन्ससाठी पर्वणी आहे. या क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्यासाठी या स्पर्धेवर लक्ष ठेवून असणाऱ्या सर्वांमध्ये सध्या फक्त एका तरूण महिला अंपायरची चर्चा आहे.
सर्वात तरूण महिला अंपायर
मध्य प्रदेशच्या शुभदा भोसले-गायकवाड यांनी या स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. झांबूआ जिल्ह्यातील क्रीडा अधिकारी असलेल्या शुभदा या देशातील सर्वात तरूण महिला अंपायर बनल्या आहेत. ओमानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सध्या चार महिला अंपायर काम करत आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि हाँगकाँगच्या महिला अंपायरचाही समावेश आहे. या सर्वांमध्ये शुभदा सर्वात तरूण अंपायर आहेत.
या स्पर्धेतील भारताच्या एकमेव महिला अंपायर असलेल्या शुभदा यांनी त्याच्या शैलीनं फॅन्सच्या मनात एक खास जागा मिळवली आहे. मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. मोहन यादव तसेच शासकीय महाविद्यालयातील सर्व स्टाफने त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
U19 World Cup : भारत-पाकिस्तान क्वार्टर फायनलमध्ये, वाचा कधी होणार एकमेकांशी सामना
लिजेंड्स लीगमध्ये भारतीय खेळाडूंची इंडिया महाराजा, पाकिस्तान, श्रीलंका बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंची आशिया लॉयन्स तर उर्वरित देशांच्या खेळाडूंची वर्ल्ड जायंट्स या टीम सहभागी झाल्या आहेत. वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युवराज सिंह, केविन पीटरसन, शोएब अख्तर, मिसबाह उल हक, इम्रान ताहीर हे निवृत्त झालेले खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. या स्पर्धेत एकूण 7 सामने होणार असून फायनल मॅच 29 जानेवारी रोजी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.