मुंबई, 23 जानेवारी : ओमानमध्ये सध्या लिंजेंड्स क्रिकेट लीग (Legends League Cricket) ही स्पर्धा सुरू आहे. ऐकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेले पण, आता निवृत्त झालेले दिग्गज या स्पर्धेत खेळत आहेत. या लीगमध्ये इंडिया महाराजा विरुद्ध वर्ल्ड जायंट्स (India Maharajas vs World Giants) ही मॅच शनिवारी झाली. या मॅचमध्ये टीम इंडियाचा माजी विकेट किपर नमन ओझानं (Naman Ojha) याने 140 रनची आक्रमक खेळी केली. ओझानं फक्त 20 ओव्हर्सच्या इनिंगमध्ये 140 रन केले. तरीही महाराजा टीम पराभूत झाली. कारण, महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) मित्रानं फक्त 19 बॉलमध्ये मॅचचं चित्र बदललं.
इंडिया महाराजानं पहिल्यांदा बॅटींग करताना 20 ओव्हर्समध्ये 3 आऊट 209 रन केले. वर्ल्ड जायंट्सनं 210 रनचे आव्हान 3 बॉल आणि 3 विकेट्स राखत पूर्ण केले. महाराजा टीमचा या स्पर्धेतील हा पहिला पराभव असून वर्ल्ड जायंट्सचा पहिलाच विजय आहे.
WI vs ENG: वेस्ट इंडिजनं उडवला इंग्लंडचा धुव्वा, 7 रनमध्येच घेतल्या 4 विकेट्स
महाराजाकडून नमन ओझानं फक्त 69 बॉलमध्ये 140 रन केले. यामध्ये त्याने 15 फोर आणि 9 सिक्स लगावले. इंडिया महाराजानं ठराविक अंतरानं विकेट घेत मॅचवर पकड मिळवली होती. पण आठव्या नंबरला बॅटींगला आलेल्या इम्रान ताहीरनं (Imran Tahir) फक्त 19 बॉलमध्ये मॅचचं चित्रं बदललं.
Imran Tahir ! You Beauty 🔥 52 off 19 balls 💥#Cricket #LegendsLeagueCricket @llct20 pic.twitter.com/B1Hxoz6w9p
— Mustafa Abid (@mmustafa_abid) January 22, 2022
42 वर्षांचा ताहीर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमकडून खेळला आहे. ताहीर हा लेग स्पिनर आहे. त्याला आजवर बॅटींगची संधी फार कधी मिळालीच नाही. पण शनिवारी त्यानं बॅटनं मैदान गाजवलं. त्याने फक्त 19 बॉलमध्ये 3 फोर आणि 5 सिक्स लगावत वर्ल्ड जायंट्सला विजय मिळवून दिला. ताहीरच्या या अर्धशतकामुळे ओझानं काढलेले 140 रन व्यर्थ ठरले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Csk, MS Dhoni