मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /जावयानंतर सासऱ्याचा संघही चॅम्पियन, आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली एशिया लायन्स ठरले LLC किंग

जावयानंतर सासऱ्याचा संघही चॅम्पियन, आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली एशिया लायन्स ठरले LLC किंग

shahid afridi

shahid afridi

शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली एशिया लायन्सने लीजेंड्स लीग क्रिकेट मास्टर्सचे विजेतेपद पटकावले. जॅक कॅलिसच्या अर्धशतकावर लंकेचा थरंगा आणि दिलशान तिलकरत्ने भारी पडला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दोहा, 21 मार्च : जावयानंतर सासऱ्यानेसुद्धा संघाला चॅम्पियन बनवलं. एक दिवस आधीच शाहीद आफ्रिदीचा जावई शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली लाहोर कलंदर्सने पाकिस्तान सुपर लीगचं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर आता शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली एशिया लायन्सने लीजेंड्स लीग क्रिकेट मास्टर्सचे विजेतेपद पटकावले. लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये एशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात अंतिम सामना झाला. दोहामध्ये झालेल्या या सामन्यात शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखील एशिया लायन्सने वर्ल्ड जायंट्सवर एकतर्फी विजय मिळवला. वर्ल्ड जायंट्सचा संघ पूर्ण सामन्यात एशिया जायंट्ससमोर हतबल दिसून आला.

गतविजेत्या वर्ल्ड जायंट्सला अंतिम सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही पातळ्यावर त्यांची कामगिरी खराब होती. वर्ल्ड जायंट्सचा कर्णधार शेन वॉटसनने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांना २० षटकात ४ बाद १४७ धावाच करता आल्या.

IND vs AUS : धोनीच्या सहकाऱ्याचं 10 वर्षांनी कमबॅक, शेवटच्या वनडेमध्ये रोहित देणार का चान्स?

जॅक कॅलिसने नाबाद ७८ धावांची खेळी केली. तर रॉस टेलरने ३२ धावा केल्या. याशिवाय इतर फलंदाज अपयशी ठरले. एशिया लायन्सच्या अब्दुल रज्जाकने चार षटकात १४ धावा देत २ विकेट घेतल्या. तर थिसारा परेराने एक गडी बाद केला.

शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली एशिया लायन्सनने १४७ धावांच आव्हान २३ चेंडू आणि ७ विकेट राखून पूर्ण केलं. एशिया लायन्सच्या दोन्ही सलामीवीरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. थरंगाने २०३च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर ८ चौकारांसह दिलशान तिलकरत्नेने ५८ धावा केल्या. वर्ल्ड जायंट्सकडून ब्रेट ली, समित पटेल आणि माँटी पानेसरने प्रत्येकी एक गडी बाद केला.

First published:
top videos

    Tags: Cricket