Home /News /sport /

सेहवाग-युवराज 'फटाके' फोडण्यासाठी पुन्हा मैदानात, आफ्रिदी-अख्तरच्या टीमसोबत टक्कर!

सेहवाग-युवराज 'फटाके' फोडण्यासाठी पुन्हा मैदानात, आफ्रिदी-अख्तरच्या टीमसोबत टक्कर!

भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) यांची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. याचसोबत नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला हरभजन सिंगही (Harbhajan Singh) या दोघांसोबत दिसणार आहे. भारताचे हे तिन्ही खेळाडू लिजंड्स क्रिकेट लीगच्या (Legends Cricket League) पहिल्या मोसमात खेळताना दिसतील.

पुढे वाचा ...
    मुंबई, 4 जानेवारी : भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) यांची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. याचसोबत नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला हरभजन सिंगही (Harbhajan Singh) या दोघांसोबत दिसणार आहे. भारताचे हे तिन्ही खेळाडू लिजंड्स क्रिकेट लीगच्या (Legends Cricket League) पहिल्या मोसमात खेळताना दिसतील. या स्पर्धेला 20 जानेवारीपासून ओमानमध्ये सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले दिग्गज या लीगमध्ये खेळताना दिसतील. स्पर्धेचे सामने ओमानच्या अल अमीरात क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत. काहीच महिन्यांपूर्वी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून पाय उतार झालेले रवी शास्त्री (Ravi Shastri) या लीगचे कमिश्नर आहेत. लिजंड्स क्रिकेट लीगमध्ये तीन टीम सहभागी होणार आहेत. यात एक इंडिया महाराजा टीम असेल, ज्याचं प्रतिनिधीत्व भारतीय खेळाडू करतील. यात इरफान पठाण, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रग्यान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोणी, हेमांग बदाणी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया आणि अमित भंडारी असतील. बाकी दोन टीम आशिया आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड असतील. आशिया टीमचं नाव एशिया लायन्स असेल. या टीममध्ये शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, चामुंडा वास, रोमेश कालुवैतर्णा, तिलकरत्ने दिलशान, अझर महमूद, उपूल थरंगा, मिस्बाह उल हक, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ, उमर गूल आणि असगर अफगाण हे खेळाडू असतील. लिजंड्स क्रिकेट लीगमध्ये चाहत्यांना सेहवाग आणि युवराज यांच्या जोडीचा मुकाबला पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि रावळपिंडी नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरशी (Shoaib Akhtar) होईल. म्हणजेच चाहत्यांना हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळणार आहे. रेस्ट ऑफ द वर्ल्डच्या खेळाडूंच्या नावाची घोषणा अजून करण्यात आलेली नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Yuvraj singh

    पुढील बातम्या