मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

इंग्लंडनंतर भारतीय क्रिकेटमध्येही वर्णद्वेषाचं वादळ, भारतीय स्पिनरचे गंभीर आरोप

इंग्लंडनंतर भारतीय क्रिकेटमध्येही वर्णद्वेषाचं वादळ, भारतीय स्पिनरचे गंभीर आरोप

इंग्लंडनंतर आता भारतीय क्रिकेटमध्येही वर्णद्वेषाचं वादळ येऊन धडकलं आहे. भारताचे माजी लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामाकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांनी आपल्याला आयुष्यभर वर्णद्वेषाचा सामना करावा लागला, असा गंभीर आरोप केला आहे.

  • Published by:  Shreyas

कानपूर, 28 नोव्हेंबर : इंग्लंडनंतर आता भारतीय क्रिकेटमध्येही वर्णद्वेषाचं वादळ येऊन धडकलं आहे. भारताचे माजी लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामाकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांनी आपल्याला आयुष्यभर वर्णद्वेषाचा सामना करावा लागला, असा गंभीर आरोप केला आहे. शिवरामाकृष्णन भारताकडून 9 टेस्ट आणि 16 वनडे खेळले आहेत. मी आयुष्यभर माझ्या रंगामुळे भेदभाव आणि टीकेचा सामना केला, त्यामुळे या गोष्टी मला आता त्रास देत नाहीत. दुर्भाग्याने या गोष्टी माझ्याच देशात झाल्या, असं ट्वीट लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांनी केलं आहे. याआधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अझीम रफीक यानेही इंग्लंडच्या अनेक क्रिकेटपटूंवर अशाचप्रकारचे आरोप केले.

लक्ष्मण शिवरामाकृष्णन एका ट्विटर पोस्टवर प्रतिक्रिया देत होते. शिवरामाकृष्णन एकमेव खेळाडू नाहीत, ज्यांनी भेदभावावर भाष्य केलं आहे. शिवरामाकृष्णन यांनी कोणत्याही खेळाडूचं नाव घेतलेलं नाही. याआधी तामिळनाडूचा ओपनर अभिनव मुकुंद (Abhinav Mukund) यानेही 2017 साली सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित केला होता. मुकुंद भारताकडून 7 टेस्ट खेळला होता. 'मी 15 व्या वर्षापासून देशात आणि देशाबाहेर प्रवास करत आहे. जेव्हा मी तरुण होतो, तेव्हापासूनच लोकांची माझ्या त्वचेच्या रंगाबद्दलची सणक माझ्यासाठी रहस्य बनली आहे,' असं मुकुंद म्हणाला होता.

'जे क्रिकेट बघतात त्यांना हे समजेल. मी उन्हात संपूर्ण दिवस ट्रेनिंग करतो आणि खेळतो. मला कधीही माझा रंग असा असल्याचा पश्चाताप झाला नाही. कारण मी जे करतो ते मला आवडतं. घराबाहेर तासंतास अभ्यास केल्यानंतर ज्या गोष्टी मला मिळवायच्या होत्या, त्या मी मिळवल्या. मी चेन्नईचा आहे, जे देशातलं सगळ्यात जास्त तापमान असलेल्या एका शहरापैकी आहे,' असं वक्तव्य मुकुंदने केलं होतं.

मागच्या वर्षी माजी भारतीय आणि कर्नाटकचा फास्ट बॉलर डोडा गणेश (Dodda Ganesh) यानेही वर्णद्वेष आणि भेदभावाबाबतचा आपला अनुभव सांगितला होता.

First published: