S M L

न्यूझीलंड : मशिदीतील गोळीबारात 49 जणांचा मृत्यू, हल्ल्याप्रकरणी 4 जण ताब्यात

बाहेरुन गोळीबार सुरू असताना बांगलादेशचे खेळाडू मशिदीत होते.

Updated On: Mar 15, 2019 02:13 PM IST

न्यूझीलंड : मशिदीतील गोळीबारात 49 जणांचा मृत्यू, हल्ल्याप्रकरणी 4 जण ताब्यात

वेलिंग्टन, 15 मार्च : न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये 2 मशिदीवर अंदाधुंद गोळीबार झाला असून यातील मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार झाला तेव्हा न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या क्रिकेट संघातील खेळाडूही त्या ठिकाणी होते.


ख्राईस्टचर्च येथे दोनवेळा गोळीबार झाला. यात पहिला हल्ला अल नूर मशिदीत झाला. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.

Loading...

मशिदीत गोळीबार होत असल्याची माहिती मिळताच सर्व खेळाडू इतर लोकांसह बाहेर पडले. त्यांना शेजारी असलेल्या उद्यानातून ओव्हल मैदानाकडे आणले. याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे. पण मला अजून याबद्दल पूर्ण माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी म्हटले.गोळीबाराची माहिती बांगलादेशचा क्रिकेटपटू तमीम इक्बालने ट्विटरवरून दिले. संघातील सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. गोळीबार झाला तेव्हाचा अनुभव सर्वांसाठी भीतीदायक असाच आहे. चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे आम्ही सुरक्षित असल्याचेही त्याने म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 08:31 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close