LIVE NOW

India vs Australia 1st ODI : धोनी-केदारची कांगारूंवर 'फिफ्टी स्ट्राईक', पराभवाचा घेतला बदला

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला भारताने 1-0 ने आघाडी घेतली.

Lokmat.news18.com | March 2, 2019, 10:24 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated March 2, 2019
auto-refresh

Highlights

Load More
हैदराबाद, 02 मार्च : केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोणीच्या जिगरबाज खेळीच्या बळावर भारताने पराभवाचा वचपा काढत आॅस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला आहे. केदार आणि धोनीने अर्धशतकी खेळी करून पहिला एकदिवसीय सामना खिश्यात घातला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.आॅस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 237 धावांचा आव्हान ठेवले होते. 237 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची मात्र, निराशाजनक सुरुवात राहिली. शिखर धवन भोपळाही न फोडता झटपट बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने फटकेबाजी सुरूच ठेवली. परंतु, रोहित शर्माचा आज करिश्मा चालला नाही. 66 चेंडूचा सामना करत तो 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि धोनीने टीमची कमान सांभाळली. परंतु, विराटही 44 धावा करून माघारी परतला. अवघ्या 6 धावांनी विराटचे अर्धशतक हुकले. त्यानंतर आलेल्या केदार जाधवने तरच खरी कमाल केली. सहा क्रमांकावर उतरून केदारने विजयाचा रथ अक्षरश: खेचून आणला. केदारने 87 चेंडूचा सामना करत 1 षटकार आणि 9 चौकार लगावत निर्णयाक 81 धावा केल्यात. धोनी आणि केदारच्या धडाकेबाज भागिदारीच्या बळावर भारताने 49 व्या षटकात 240 धावा करून सामना जिंकला. विशेष म्हणजे, आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये धोनीचे विनिंग षटकार नाही पण चौकार लगावत विजयावर मोहोर उमटवली. त्याआधी, भारतीय गोलंदाजानी कांगारूंची 'शिकार' केली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिंच बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यानंतर ख्वाजा आणि स्टोईनिसने डाव सावरला. ख्वाजाने 50 धावा केल्या. त्याला कुलदीप यादवने बाद केले. त्यानंतर पुन्हा कुलदीपने पुढच्या षटकात हँडसकॉम्बला बाद करत ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के दिले. 4 बाद 133 धावा झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या डावाची सूत्रे ग्लेन मॅक्सवेल आणि टर्नरने हाती घेतली. दोघांनी सावध खेळ करत डाव धावसंख्येत भर टाकण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद शमीने या दोघांची जोडी फोडताना टर्नरला 21 धावांवर त्रिफळाचित केले. त्यानंतर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या मॅक्सवेललाही त्रिफळाचित केले. अवघा संघ 236 धावांवर गारद झाला. भारताकडून मोहम्मद शामी, जसप्रीत ब्रुमरा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. तर केदार जाधवने 1 गडी बाद केला.
corona virus btn
corona virus btn
Loading