भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडवर मिळवलेला हा विजय खास आहे.

  • Share this:

26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे दोन्ही दिवस भारतात उत्सवाप्रमाणं साजरे केले जातात. पण भारतीय क्रिकेटसाठी गेल्या वर्षीपर्यंत प्रजासत्ताक दिन खास नव्हता.

क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला 26 जानेवारीला एकही सामना जिंकता आलेला नव्हता. ती कसर आज न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने भरून काढली आणि भारतीय क्रिकेट संघाने प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवला.

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 90 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच भारताचा 26 जानेवारीला असलेला विजयाचा दुष्काळ संपला.

यापूर्वी भारतीय संघाने २६ जानेवारीला शेवटचा एकदिवसीय सामना 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. सिडनीत खेळलेल्या या सामन्यात पावसामुळे सामना अनिर्णित राहिला होता.

त्याआधी 2000 मध्ये अॅडलेडला भारताने या दिवशी सामना खेळला होता. सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला तेव्हा 152 धावांनी पराभव पत्करावा लागला.

1986 मध्ये भारताने पहिल्यांदा 26 जानेवारीला सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या या सामन्यात सुनिल गावस्कर यांच्या 77 धावांच्या खेळीनंतरही भारताला 36 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2019 03:45 PM IST

ताज्या बातम्या