IndvsNZ : भारताने अंतिम सामन्यासह मालिका 4-1 ने जिंकली

IndvsNZ : भारताने अंतिम सामन्यासह मालिका 4-1 ने जिंकली

भारताच्या युझवेंद्र चहलने ३ तर हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

  • Share this:

विलिंग्टन, 3 फेब्रुवारी : चौथ्या वनडेप्रमाणेच पाचव्या वनडेत देखील आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतरही गोलंदाजांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. अंबाती रायडू, विजय शंकर, हार्दिक पांड्या यांच्या शानदार खेळीमुळे भारताने न्यूझीलंडपुढे विजयासाठी 253 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाला 217 धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताच्या युझवेंद्र चहलने सर्वाधिक 3 गडी बाद केले.मोहम्मद शमीने, हार्दिक पांड्याने प्रत्येकी दोन गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडचे 6 फलंदाज बाद झाल्यानंतर एका बाजूने जेम्स निशामने विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, 33 व्या षटकात केदार जाधवच्या गोलंदाजीवर नाट्यमयरित्या त्याला धोनीने चपळाईनं धावबाद केलं. त्यानंतर न्यूझीलंडचे तळाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. 45 व्या षटकात पहिल्याच चेंडूवर ट्रेन्ट बोल्टला झेलबाद करत भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला होता.मात्र हा निर्णय भारताच्या अंगलट आला.नाणेफेक जिंकून मैदानात उतरल्यावर डावाच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने रोहित शर्माला (2 धावा) बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर ट्रेन्ट बोल्टने शिखर धवनला (6 धावा) तर मॅट हेन्रीने शुभमन गिलला (7 धावा) बाद केले.त्यानंतर महेंद्रसिंग धोनीही बाद झाल्याने भारताची अवस्था 9.3 षटकात 4 बाद 18 धावा अशी झाली होती. त्यानंतर रायडू आणि विजय शंकर यांनी पाचव्या विकेटसाठी 98 धावांची भागिदारी केली.शंकर आणि रायडू यांची जोडी जमली असे वाटत असतानाच शंकर (45 धावा) धावबाद झाला.

त्यानतंर सर्वांना रायडूच्या शतकाची प्रतिक्षा होती पण तो 111 चेंडूत 90 धावा करून बाद झाला. एक उंच फटका खेळण्याच्या नादात रायडू झेलबाद झाला. रायडू पाठोपाठ केदार जाधवला मॅट हेन्रीने 34 धावांवर त्रिफळाचित केलं.

त्यानंतर हार्दिक पांड्याने 5 षटकारासह 22 चेंडूत 45 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारताने 250पर्यंत मजल गाठली. भारताने 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली आहे.

वाचा संबधित बातमी : धोनीच्या धाकडबाज फिल्डिंगने असा फिरवला सामना

First published: February 3, 2019, 7:49 AM IST

ताज्या बातम्या