Home /News /sport /

लसिथ मलिंगाची नवी इनिंग, 'यॉर्कर किंग' होणार या टीमचा कोच!

लसिथ मलिंगाची नवी इनिंग, 'यॉर्कर किंग' होणार या टीमचा कोच!

श्रीलंकेचा दिग्गज फास्ट बॉलर लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याने त्याच्या करियरची नवीन इनिंग सुरू केली आहे. मलिंगा श्रीलंकन टीमचा फास्ट बॉलिंग सहाय्यक कोच होणार आहे.

    मुंबई, 26 जानेवारी : श्रीलंकेचा दिग्गज फास्ट बॉलर लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याने त्याच्या करियरची नवीन इनिंग सुरू केली आहे. मलिंगा श्रीलंकन टीमचा फास्ट बॉलिंग सहाय्यक कोच होणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीने मलिंगाच्या नावाची शिफारस श्रीलंका क्रिकेट बोर्डाला केली. आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सकडून एका दशकापेक्षा जास्त काळ खेळलेला मलिंगा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-20 सीरिजमध्ये टीमच्या तयारीची देखरेख करेल. श्रीलंका ऑस्ट्रेलियात (Sri Lanka vs Australia) 5 मॅचची सीरिज खेळणार आहे. लसिथ मलिंगा वनडे आणि टी-20 क्रिकेटमधला सगळ्यात धोकादायक बॉलरपैकी एक होता. मलिंगाच्या नेतृत्वात श्रीलंकेने 2014 टी-20 वर्ल्ड कप जिंकला. मलिंगाने त्याच्या क्रिकेट करियरमध्ये (फर्स्ट क्लास, लिस्ट ए, टी20) एकूण 1093 विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मलिंगाच्या नावावर टेस्टमध्ये 101, वनडेमध्ये 338 आणि टी-20 मध्ये 107 विकेट घेतल्या. मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 वेळा हॅट्रिक घेतली आहे. तसंच लागोपाठ 4 बॉलला 4 विकेट घेण्याचा विक्रम मलिंगाने दोनवेळा केला आहे. मलिंगा टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 100 विकेट घेणारा पहिलाच बॉलर आहे. तसंच वनडे क्रिकेटमध्ये तीन हॅट्रिक घेणारा मलिंगा एकमेव बॉलर आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक 170 विकेट आहेत. लसिथ मलिंगाचा जन्म श्रीलंकेच्या गॉलमध्ये झाला होता. तीन भावांमध्ये मलिंगा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. मलिंगाचे वडील बस मेकॅनिक होते, तर आई ग्रामीण भागात काम करत होती. 13 व्या वर्षी मलिंगाने क्रिकेट खेळायला सुरूवात केली. तर 17 व्या वर्षी लेदर बॉलने पहिल्यांदा बॉलिंग केली. मलिंगाने 2004 साली श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 16 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर 2020 साली त्याने निवृत्ती घेतली. वनडे आणि टी-20 करियर जास्त काळ चालावं, म्हणून मलिंगाने 2010 सालीच टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या