IPL 2019 : 24 तासांत मुंबई ते श्रीलंका दरम्यान मलिंगाचा ‘हा’ अनोखा पराक्रम

मलिंगा यापुढे आयपीएलचं बारावे हंगाम खेळणार की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे. कारण 11 एप्रिलपासून मलिंगा लिस्ट ए- टुर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहे.

  • Share this:

मुंबई इंडियन्स संघाचा आघाडीचा गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या मायदेशी परतला आहे. यामुळं रोहितच्या मुंबई इंडियन्सला झटका बसला असला तरी, मुंबईचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगानं पुन्हा आपला विचार बदलत, आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मलिंगाला आधीच आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांना मुकावे लागले होते.

इंग्लंडमध्ये होत असलेल्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने श्रीलंका क्रिकेट मंडळाने 4 ते 11 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळाडूंना सहभागी होण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार मलिंगा सध्या स्थानिक सामन्यांमध्ये सहभागी झाला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे 24 तासांच्या कालावधीत मलिंगानं टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळले. एवढच नाही तर, या दोन्ही सामन्यात त्यानं एकूण 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

बुधवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईकडून खेळणाऱ्या लसिथ मलिंगानं दमदार गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या होत्या. या विकेटच्या मदतीनं मुंबईनं चेन्नईचा विजयरथ थांबवला आणि आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळवला. या सामन्यानंतर लगेचच मलिंगा आपल्या मायदेशी परतला.

श्रीलंकमध्ये सध्या सुरू असलेल्या सुपर फोर टुर्नामेंटमध्ये मलिंगा सहाभागी झाला आहे. यातील गुरुवारी झालेल्या पहिला सामन्यात मलिंगानं घातक गोलंदाजी करत, लिस्ट-एमध्ये  आपलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. 10 ओव्हरमध्ये केवळ 49 धावा देत मलिंगानं 7 विकेट घेतले. या त्याच्या कामगिरीच्या जोरावर मलिंगाच्या संघानं 156 धावांनी विरोधी संघावर विजय मिळवला.

याआधी 24 तासांत 83 धावा देत 10 विकेट, हा मलिगांचा वैयक्तिक पराक्रम आहे. दरम्यान मलिंगा यापुढे आयपीएलचं बारावे हंगाम खेळणार की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे. कारण 11 एप्रिलपासून मलिंगा लिस्ट ए- टुर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहे. दम्यान 11 एप्रिलनंतर मलिंगा पुन्हा मुंबई संघाच्या चमुत सामिल होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 09:43 AM IST

ताज्या बातम्या