यॉर्कर किंग मलिंगाचे 'हे' पाच रेकॉर्ड्स मोडणे दिग्गजांनाही नाही जमले!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या मलिंगानं केवळ गोलंदाजीमध्ये नाही तर फलंदाजीमध्येही रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.

  • Share this:

फलंदाजांची झोप उडवणारा यॉर्कर किंग आज बांगलादेशविरोधात आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीधरन आणि चामिंडा वास यांच्यानंतर सर्वात जास्त विकेट घेण्याची कामगिरी मलिंगानं केली आहे. मलिंगाच्या नावावर असलेले हे पाच रेकॉर्ड मोडणे कोणालाच जमलेले नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग चार चेंडूंवर चार विकेट घेण्याची किमया आतापर्यंत केवळ मलिंगानं केली आहे. मलिंगानं 2007मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात ही कामगिरी केली होती.

तसेच, मलिंगा हा एकमेव गोलंदाज आहे, ज्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन हॅट्रिक घेतल्या आहेत. ऑगस्ट 2011मध्ये मलिंगानं तिसरी हॅट्रिक घेतली होती.

केवळ गोलंदाजीमध्येच नाही तर फलंदाजीमध्येही मलिंगाच्या नावावर एक विक्रम आहे. 2010मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात एकदिवसीय मालिकेत 9व्या विकेटसाठी मॅथ्यूजसोबत सर्वात जास्त म्हणजे 132 धावांची भागिदारी केली आहे.

याच सामन्यात मलिंगानं 10व्या क्रमांकावर येत 56 धावांची खेळी केली होती. 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं मलिंगानं 56 धावा केल्या होत्या. तसेच, 10व्या क्रमांकावर फलंदाजी करत अर्धशतक लगावणारा मलिंगा एकमेव गोलंदाज आहे.

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये दोन हॅट्रिक घेण्याचा विक्रम एकमेव मलिंगाच्या नावावर आहे. 2007च्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिली तर, 2011मध्ये केनिया विरोधात दुसरी हॅट्रिक घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 03:50 PM IST

ताज्या बातम्या