...म्हणून फलंदाजांची झोप उडवणारा मलिंगा 10 वर्षात घरी गेलाच नाही!

...म्हणून फलंदाजांची झोप उडवणारा मलिंगा 10 वर्षात घरी गेलाच नाही!

गेली 16 वर्ष मलिंगा श्रीलंका संघासाठी खेळत आहे. निवृत्तीनंतर मात्र लसिथ मलिंगाला ऑस्ट्रेलियात परमनंट रेसिडेंसी मिळाली असून तो कुटुंबासोबत तिथे रहायला जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

कोलंबो, 26 जुलै : फलंदाजांची झोप उडवणारा यॉर्कर किंग आज बांगलादेशविरोधात आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीधरन आणि चामिंडा वास यांच्यानंतर सर्वात जास्त विकेट घेण्याची कामगिरी मलिंगानं केली आहे. गेली 16 वर्ष मलिंगा श्रीलंका संघासाठी खेळत आहे. मात्र एवढ्या वर्षात मलिंगानं फक्त देशासाठी स्वत:ला समर्पित केले होते. त्यामुळं 10 वर्ष त्याला घरीही जाता आले नाही.

मलिंगाचे रेकॉर्ड सगळ्यांना माहित आहे पण खुप कमी लोकांना त्यांचा कुटुंबाबद्दल माहित आहे. श्रीलंकेमधील गाले येथील रथगामा कस्बे येथे मलिंगाचे मुळ घर आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार, अगदी सामन्या माणसासारखे मलिंगाचे घर आहे. एवढेच नाही तर त्याचे आई-बाबा अजूनही शिलाईचे काम करतात.

एक्सप्रेसशी बोलताना मलिंगाच्या आईनं, "घरातील एक कोपऱ्यात मलिंगाची आठवण आली की पाहण्यासाठी आम्ही एक फोटो लावला आहे. क्रिकेट खेळण्यात व्यस्त असल्यामुळं तो जवळजवळ 10 वर्ष घरी आलेला नाही. मी त्याचे सामने पाहायला जाते. आता निवृत्तीनंतर तो घरी येईल", असे सांगितले.

35 वर्षीय मलिंगानं आपल्या करिअरमध्ये 814 विकेट घेतल्या आहेत. यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 335, टी-20मध्ये 378 आणि टेस्टमध्ये 101 विकेट घेतल्या आहेत. बांगलादेश विरोधात होणाऱ्या आजच्या सामन्यात तीन विकेट घेत मलिंगा निवृत्तीआधी सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करेल.

मलिंगा सोडणार देश

श्रीलंकेला 2014 मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड टी 20 चॅम्पियन करणारा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा लवकरच देश सोडू शकतो. लसिथ मलिंगाला ऑस्ट्रेलियात परमनंट रेसिडेंसी मिळाली असून तो कुटुंबासोबत तिथे रहायला जाण्याची शक्यता आहे. मलिंगाचे वय 35 असून तो प्रशिक्षक म्हणून यापुढे क्रिकेटमध्ये राहणार असल्याचं समजतं. ऑस्ट्रेलियात कोणत्याही संघाचा तो प्रशिक्षक होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.मलिंगाने याआधी 2018 मध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2019 मध्ये तो खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता.

वर्ल्ड कपमध्ये केली चांगली खेळी

यॉर्कर किंग लसिथ मलिंगानं वर्ल्ड कप 2019मध्ये चांगली गोलंदाजी केली. मात्र श्रीलंका संघाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करता आले नाही. लीग स्टेजमध्ये बाहेर पडल्यानंतरच मलिंगानं निवृत्ती जाहीर केली.

SPECIAL REPORT: विचित्र आवाज करणाऱ्या यंत्राचा VIDEO व्हायरल, 'हे' आहे सत्य

Published by: Akshay Shitole
First published: July 26, 2019, 11:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading