Lasith Malinga Retirement : निवृत्तीनंतर मलिंगा सोडणार श्रीलंका, धरणार 'या' देशाची वाट

श्रीलंकेकडून तब्बल 16 वर्ष क्रिकेट खेळलेला मलिंगा निवृत्तीनंतर मात्र देश सोडून जाण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:

फलंदाजांची झोप उडवणारा यॉर्कर किंगनं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर केली. मुथैय्या मुरलीधरन आणि चामिंडा वास यांच्यानंतर सर्वात जास्त विकेट घेण्याची कामगिरी मलिंगानं केली आहे.

फलंदाजांची झोप उडवणारा यॉर्कर किंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर केली. मुथैय्या मुरलीधरन आणि चामिंडा वास यांच्यानंतर सर्वात जास्त विकेट घेण्याची कामगिरी मलिंगानं केली आहे.

श्रीलंकेकडून तब्बल 16 वर्ष क्रिकेट खेळलेला मलिंगा निवृत्तीनंतर मात्र देश सोडून जाण्याच्या तयारीत आहे. याच मलिंगानं 2014 आयसीसी क्रिकेट वर्ल्ड टी-20मध्ये श्रीलंकेला चॅम्पियन केले होते.

35 वर्षीय मलिंगानं आपल्या करिअरमध्ये 814 विकेट घेतल्या आहेत. यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 335, टी-20मध्ये 378 आणि टेस्टमध्ये 101 विकेट घेतल्या आहेत. मात्र निवृत्तीनंतर लसिथ मलिंगा आपल्या कुटुंबासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याची शक्यता आहे. मलिंगाला ऑस्ट्रेलियाची परमनंट रेसिडेंसी मिळाली आहे.

मलिंगाचे वय 35 असून तो प्रशिक्षक म्हणून यापुढे क्रिकेटमध्ये राहणार असल्याचं समजतं. ऑस्ट्रेलियात कोणत्याही संघाचा तो प्रशिक्षक होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

मलिंगाने याआधी 2018 मध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2019 मध्ये तो खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता.

गोलंदाजीमध्येच नाही तर फलंदाजीमध्येही मलिंगाच्या नावावर एक विक्रम आहे. 2010मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात एकदिवसीय मालिकेत 9व्या विकेटसाठी मॅथ्यूजसोबत 132 धावांची विक्रमी भागिदारी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 09:42 AM IST

ताज्या बातम्या