• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'आता माझे बूट कायमची विश्रांती घेतील', लसिथ मलिंगाची निवृत्तीची घोषणा

'आता माझे बूट कायमची विश्रांती घेतील', लसिथ मलिंगाची निवृत्तीची घोषणा

श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मलिंगाने मंगळवारी सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

 • Share this:
  मुंबई, 14 सप्टेंबर : श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मलिंगाने मंगळवारी सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने आधीच निवृत्ती घेतली होती. 'मी आता क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून संन्यास घेत आहे. माझ्या या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्यांचे आभार. आता मी युवा क्रिकेटपटूंसोबत आपला अनुभव शेयर करणार आहे. माझ्या बुटांना 100 टक्के विश्रांती देण्याचा निर्णय मी घेतला आहे,' असं मलिंगा म्हणाला आहे. श्रीलंकेसोबतच लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये मुंबईला 5 वेळा चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका निभावली. मलिंगा पहिल्या मोसमापासून मुंबई इंडियन्ससोबतच खेळला. आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही मलिंगाच्या नावावर आहेत. मलिंगा मागच्या वर्षापासूनच टी-20 क्रिकेटपासून लांब आहे. आयपीएल 2020 (IPL) मधूनही त्याने आपलं नाव मागे घेतलं होतं. मुंबई इंडियन्सलाही (Mumbai Indians)  त्याने याबाबतची माहिती दिली होती. मलिंगा टी-20 क्रिकेटमधल्या सगळ्यात यशस्वी बॉलरपैकी एक आहे. मलिंगाने 295 टी-20 मॅचमध्ये 390 विकेट घेतल्या. मलिंगाचा इकोनॉमी रेट फक्त 7.07 चा होता. टी-20 मध्ये त्याने 5 वेळा 5 विकेट आणि 10 वेळा 4 विकेट घेतल्या.
  Published by:Shreyas
  First published: