Lasith Malinga 4 wickets in 4 balls Video : मलिंगाने 4 चेंडूत 4 गडी धाडले तंबूत, न्यूझीलंडला यॉर्करचा दणका देत केला हा विश्वविक्रम

Lasith Malinga 4 wickets in 4 balls Video : मलिंगाने 4 चेंडूत 4 गडी धाडले तंबूत, न्यूझीलंडला यॉर्करचा दणका देत केला हा विश्वविक्रम

मलिंगाने हॅट्ट्रिकची नोंद करताना पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसिम आक्रमचा विक्रम मोडला.

  • Share this:

पल्लीकल, 07 सप्टेंबर : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगानं न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यानं 4 चेंडूत 4 गडी बाद करत न्यूझीलंडला दणका दिला. मलिंगांने कुलीन मुन्रो, हामिश रुदरफोर्ड, कुलीन डी ग्रँडहोम आणि रॉस टेलर या फलंदाजांना लागोपाठ चार चेंडूवर तंबूत धाडलं. मलिंगानं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. त्याने पहिल्यांदा 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 चेंडूत 4 गडी बाद केले होते. दोनवेळा अशी कामगिरी करणारा मलिंगा जगातील एकमेव गोलंदाज आहे.

अफगाणिस्तानच्या राशिद खानने सलग 4 चेंडूत 4 विकेट घेतल्या होत्या. त्यानं आयर्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. तर मलिंगाने 4 विकेटसह आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे. टी20 मध्ये 100 विकेट घेणारा लसिथ मलिंगा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 हॅट्ट्रिक करण्याचा विक्रम मलिंगाच्या नावावर आहे. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 तर टी20 मध्ये 2 वेळा हॅटट्रिक केली आहे. त्याच्याआधी पाकिस्तानच्या वसीम आक्रम यांच्या नावावर 4 वेळा हॅटट्रिकची नोंद होती.

मलिंगानं न्यूझीलंडविरुद्ध चारही यॉर्कर चेंडू टाकत विकेट घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर कुलीन मन्रोला बाद केलं. त्यानं 12 धावा केल्या. त्याच्यानंतर 6 वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या हाशिम रुदरफोर्डला पायचित केलं. पंचांनी अपिल फेटाळून लावलं होतं. मात्र, मलिंगानं डीआरएस घेतला आणि पंचांना निर्णय बदलावा लागला. हॅट्ट्रिक बॉलवर डी ग्रँडहोम खेळत होता. फॉर्ममध्ये असलेल्या ग्रँडहोमचा मलिंगानं त्रिफळा उद्ध्वस्त करून हॅटट्रिक केली. हॅटट्रिक करूनही मलिंगा थांबला नाही. त्यानं चौथ्या चेंडूवर रॉस टेलरला बाद केलं.

नाशिकमध्ये बिझनेस बँक इमारतीत अग्नितांडव! आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 7, 2019 02:51 PM IST

ताज्या बातम्या