Home /News /sport /

पॉर्न स्टारला मेसेज पाठवतोय 6 अब्ज कमावणारा खेळाडू, VIDEO VIRAL

पॉर्न स्टारला मेसेज पाठवतोय 6 अब्ज कमावणारा खेळाडू, VIDEO VIRAL

पॉर्न स्टारने आपल्याला दिग्गज खेळाडू मेसेज पाठवत असल्याचा खुलासा एका व्हिडिओमधून केला आहे.

    लंडन, 28 फेब्रुवारी : पॉर्न स्टार लैना रोड्स हिने सोशल मीडियावर एक धक्कादायक खुलासा केला आहे. दिग्गज फुटबॉलपटू आपल्याला मेसेज पाठवत असल्याचं 23 वर्षीय लैना रोडसने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. तिनं म्हटलं की, फुटबॉलपटूचे इन्स्टाग्रामवर 4.3 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि वर्षाला तो 6 अब्ज रुपयांची कमाई करतो. लैनाने तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत असताना याची माहिती दिली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लैना रोड्सचा मित्र माइक मल्लक याने व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये लैना रोड्स बोलत असताना म्हणाला की, एका फुटबॉल खेळाडूने पर्सनल मेसेज पाठवला आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 43 मिलियन फॉलोअर्स आहेत. लैनाने हा खुलासा केल्यानंतर तिचे फ्रेंडस् तिला फुटबॉलपटूचे नाव विचारतात मात्र ती सांगत नाही. शिकागोमध्ये जन्म झालेली लैना रोड्स स्वत: सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 7.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. यात एखादा फुटबॉलपटू तिला फॉलो करत असेल तर ती फार मोठी गोष्ट नाही. पॉर्न स्टार्स आणि अनेक दिग्गज खेळाडूंचे जुने नाते आहे. अनेक दिग्गज खेळाडू पॉर्न स्टार्ससोबत रिलेशनमध्ये राहिले आहेत. अमेरिकन टेनिस स्टार जेनिफर कॅपरियातीने पॉर्न स्टार डेल डबोनला डेट केलं होतं. सहा वर्षे दोघेही रिलेशनमध्ये होते. तर प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्सवरही पॉर्न स्टारला डेट केल्याचा आरोप करण्यात आला होता. वाचा : आर. अश्विन शोधतोय नोकरी? CV पोस्ट केला पण एक गोष्ट 'लपवली'
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Porn, Porn star

    पुढील बातम्या