'सातारा एक्स्प्रेस' ललिता बाबर अडकली लग्नबेडीत

'सातारा एक्स्प्रेस' ललिता बाबर अडकली लग्नबेडीत

ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणारी सातारा एक्स्प्रेस ललिता बाबर ही आज लग्नाच्या बेडीत अडकली. प्रशासनात वरिष्ठ अधिकारी असलेल्या डॉ. संदीप भोसले यांच्याशी ललिता हिचा विवाह झाला.

  • Share this:

16 मे : ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणारी सातारा एक्स्प्रेस ललिता बाबर ही आज लग्नाच्या बेडीत अडकली. प्रशासनात वरिष्ठ अधिकारी असलेल्या डॉ. संदीप भोसले यांच्याशी ललिता हीचं लग्न झालं.

साताऱ्याची आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेली धावपटू ललिता बाबर आज लग्नाच्या बेडीत अडकली .साताऱ्यातील यशोदा महाविद्यालयाच्या प्रांगणात हा विवाह सोहळा पार पडला.  ललिता आणि डॉ. संदीप भोसले यांच्या विवाह सोहळ्यास देशभरातील दिग्गज मंडळी वऱ्हाडी म्हणून उपस्थित होती.

सातारी एक्स्प्रेस ललिता बाबर आणि सोलापूरच्या लिगाडवाडीसारख्या दुष्काळी गावातून उच्चपदस्थ अधिकारी असलेले डॉ. संदीप भोसले यांचा विवाह आज पार पडला. नेहमी 'स्पोर्ट्स ड्रेस'मध्ये झळकणाऱ्या ललिताची नववधू वेशभूषा साऱ्यांनाच भावून गेली. विवाह सोहळ्याच्या व्यासपीठावर केलेल्या डेकोरेशनमधील 'ऑलिंपिक' चे बोधचिन्हही सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

यावेळी चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर, निर्माता संजय जाधव, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद-पंचायत समिती पदाधिकारी, बहुतांश लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच सामाजिक-राजकीय कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं उपस्थित होते.

First published: May 16, 2017, 8:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading