मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /बाबर आझमच्या अडचणीत वाढ, कोर्टाने दिला FIR दाखल करण्याचा आदेश

बाबर आझमच्या अडचणीत वाढ, कोर्टाने दिला FIR दाखल करण्याचा आदेश

लाहोरच्या एका कोर्टाने महिला अत्याचाराच्या प्रकरणामध्ये पाकिस्तान क्रिकेट टीमचा (Pakistan Cricket) कर्णधार बाबर आझम (Babar Azam) विरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

मुंबई, 19 मार्च : लाहोरच्या एका कोर्टाने महिला अत्याचाराच्या प्रकरणामध्ये पाकिस्तान क्रिकेट टीमचा (Pakistan Cricket) कर्णधार बाबर आझम (Babar Azam) विरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. हमिजा मुख्तार या महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधिशांनी बाबरविरुद्ध एफआयआर दाखल करायला सांगितला. बाबर आझमविरुद्ध तक्रार केल्यानंतर आपल्याला व्हॉट्सऍपवर धमकीचे मेसेज मिळत असल्याचा दावा, या महिलेने केला. सुनावणीदरम्यान चौकशी अधिकाऱ्यांनी हमिजाने याबाबत सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केल्याचं सांगितलं. तसंच ज्या नंबरवरून महिलेला धमकी देण्यात आली, त्यातला एक नंबर बाबर आझमचा असल्याची माहिती तपास यंत्रणांनी कोर्टाला दिली.

हमिजाने आरोप केला होता की 'आपल्याला वेगवेगळ्या नंबरवरून व्हॉट्सऍपवर धमकीचे मेसेज मिळत आहेत. एक अज्ञात व्यक्ती आपल्याला ब्लॅकमेल करत आहे, या व्यक्तीकडे आपले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली जात आहे.' याआधी हमिजाने बाबर आझमवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.

दुसरीकडे आपल्यावर लागलेल्या आरोपांमुळे आपल्या मैदानातल्या कामगिरीवर काहीही परिणाम झालेला नसल्याचं बाबर आझम म्हणाला. मला वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणींचा सामना करण्याची सवय असल्याची प्रतिक्रिया बाबरने दिली. 'वैयक्तिक मुद्द्यांमुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेच्या आगामी दौऱ्यात माझी कामगिरी प्रभावित होणार नाही. ही माझी वैयक्तिक गोष्ट आहे आणि माझा वकील कोर्टात हे पाहून घेईल. आपल्याला आयुष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो, मलाही याची सवय आहे. या मुद्द्यामुळे माझा फॉर्म किंवा क्रिकेटवर परिणाम होणार नाही,' अशी प्रतिक्रिया बाबरने दिली.

First published:

Tags: Babar azam, Cricket news, Pakistan