मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : याला म्हणतात Lady Luck! दिग्गज क्रिकेटपटूचा भाग्योदय, टीम इंडियात मोठी जबाबदारी

IND vs NZ : याला म्हणतात Lady Luck! दिग्गज क्रिकेटपटूचा भाग्योदय, टीम इंडियात मोठी जबाबदारी

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) निराशाजनक कामगिरी केल्यानंतर टीम इंडियामध्ये (Team India) बदलांचे वारे वाहू लागले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजपासून रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे, तर केएल राहुलला (KL Rahul) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) निराशाजनक कामगिरी केल्यानंतर टीम इंडियामध्ये (Team India) बदलांचे वारे वाहू लागले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (India vs New Zealand) नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराट कोहलीने (Virat Kohli) आधीच सांगितलं होतं. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजपासून रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे. टी-20 वर्ल्ड कप खेळलेल्या 8 खेळाडूंची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी निवड झाली नाही. यातल्या काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर काहींना डच्चू मिळाला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी विराट कोहली, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे, कारण इंग्लंड दौऱ्यापासून हे चौघं क्रिकेट खेळत आहेत. तर दुसरीकडे वरुण चक्रवर्ती, हार्दिक पांड्या आणि राहुल चहर यांची टीममधून गच्छंती झाली आहे.

नव्यांना संधी

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, दीपक चहर, हर्षल पटेल, आवेश खान आणि मोहम्मद सिराज यांची टीममध्ये निवड झाली आहे.

केएल राहुलचा भाग्योदय

विराट कोहलीने टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यामुळे केएल राहुलचा (KL Rahul) भाग्योदय झाला आहे. रोहित कर्णधार झाल्यामुळे केएल राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे लेडी लक राहुलच्या बाजूने असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने 18 बॉलमध्ये अर्धशतक केलं. त्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. राहुलच्या या फटकेबाजीनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड आथिया शेट्टी (Athiya Shetty) देखील चांगलीच खूश झाली होती. दुबईतील स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या आथियानं जोरदार टाळ्या वाजवत राहुलच्या अर्धशतकाचं सेलिब्रेशन केलं.

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यानंतर लगेचच आथिया शेट्टीचा वाढदिवस होता. राहुलची ही खेळी म्हणजे तिच्यासाठी बर्थ-डे गिफ्ट ठरली. राहुलनं या खेळीनंतर आथिया शेट्टीसोबतचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. तसंच त्यावर 'हॅप्पी बर्थ डे माय लव्ह' असं कॅप्शन दिलं. राहुलनं पहिल्यांदाच जाहीरपणे आथियावरील प्रेमाची कबुली दिली.

View this post on Instagram

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

राहुलने आथियासोबतच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर लगेचच त्याचं नशीब फळफळलं आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या उपकर्णधार म्हणून राहुलला प्रमोशन मिळालं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी भारतीय टीम

रोहित शर्मा, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर.अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

First published:

Tags: Kl rahul, Rohit sharma, Team india