कल्याणकर कुणाल पाटील यांची एशियन पाॅवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णभरारी

कल्याणकर कुणाल पाटील यांची एशियन पाॅवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णभरारी

भारताच्या पुरुष संघाकडून खेळताना 105 किलो वजनी गटातील सर्वच सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. यापूर्वी 15 वर्षांपूर्वी कल्याणकर महिला खेळाडू दिपाली कुलकर्णीने अशीच 4 सुवर्ण पदकं जिंकली होती.

  • Share this:

6 मे :इंडोनेशिया येथे सुरू असणाऱ्या एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कल्याणच्या कुणाल पाटीलने एक नवा इतिहास रचला आहे. भारताच्या पुरुष संघाकडून खेळताना 105 किलो वजनी गटातील सर्वच सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. यापूर्वी 15 वर्षांपूर्वी कल्याणकर महिला खेळाडू दिपाली कुलकर्णीने अशीच 4 सुवर्ण पदकं जिंकली होती. कुणालने केलेल्या या देदीप्यमान कामगिरीमुळे कल्याणकरांची मान अभिमानाने उंचावली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

पनवेलला इंजिनिअरिंगच्या अखेरच्या वर्षात शिकत असणाऱ्या कुणालने डिसेंबरमध्ये झालेल्या इंडियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चकमदार कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग फेडरेशनतर्फे इंडोनेशियामध्ये 1 ते 5 मे दरम्यान एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात 105 किलो वजनी गटात कुणालने स्कॉट, बेंचप्रेस, डेडलिफ्ट आणि ओव्हरऑल अशा चारही प्रकारात कुणालने सुवर्ण पदक जिंकले. कुणालच्या या चमकदार कामगिरीमुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कुणालचे वडील रिलायन्स कम्युनिकेशनमध्ये अधिकारीपदावर कार्यरत असून आई गृहीणी आहे. तर त्याची लहान बहीण आकांक्षा 12 वीला शिकत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2017 03:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading