अनिल कुंबळेच प्रशिक्षक राहणार, विराटची 'लाॅबिंग'गिरी फसली

अनिल कुंबळेच प्रशिक्षक राहणार, विराटची 'लाॅबिंग'गिरी फसली

बीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत प्रशिक्षकपदाची जबाबदारी अनिल कुंबळेंवर सोपवलीये.

  • Share this:

10 जून : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेला वाढता विरोध अखेर मावळलाय. बीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत प्रशिक्षकपदाची जबाबदारी अनिल कुंबळेंवर सोपवलीये. त्यामुळे कॅप्टन विराट कोहलीला मनपसंतीचा कोच मिळू शकला नाही.

लंडनमध्ये सौरव गांगुली,सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या सल्लागार समितीने अनिल कुंबळेच टीम इंडियाचा प्रशिक्षक राहिल असे स्पष्ट संकेत दिले आहे. बीसीआयने अधिकृत घोषणा अजून केली नाही मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळे प्रशिक्षक असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे विराटने कुंबळेला पुन्हा प्रशिक्षकपद मिळू नये यासाठी रवी शास्त्री यांचं नावही पुढं केलं.

पण सल्लागार समितीने जर कुंबळेचा चांगला रेकाॅर्ड असून सुद्धा पुन्हा प्रशिक्षकपदासाठी संधी दिली नाही तर यातून चुकीचा संदेश दिला जाईल. पण जर कुंबळेंनी स्वत:हुन माघार घेतली तर वीरेंद्र सेहवाग टीम इंडियाचा प्रशिक्षक होऊ शकतो. पण कुंबळेना प्रशिक्षकपदावरुन दूर करणं हे सल्लागार समितीकडून शक्य होणार नाही. कारण याच समितीने मागील वेळा रवी शास्त्रींचा पत्ता कट करून कुंबळेला प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली होती.

त्यामुळे या समितीने कॅप्टन कोहलीला धक्का देत तुर्तास कुंबळेच प्रशिक्षक राहणार असल्याचं ठणकावून सांगितलंय.

First published: June 10, 2017, 5:16 PM IST

ताज्या बातम्या