Home /News /sport /

...तेव्हा मी आत्महत्या करणार होतो, कुलदीप यादवचा मोठा खुलासा

...तेव्हा मी आत्महत्या करणार होतो, कुलदीप यादवचा मोठा खुलासा

Kuldeep Yadav

Kuldeep Yadav

भारतीय गोलंदाज कुलदीप यादव(Kuldeep Yadav ) आज 27 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  मुंबई, 14 डिसेंबर: भारतीय गोलंदाज कुलदीप यादव(Kuldeep Yadav ) आज 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. 14 डिसेंबर 1994 रोजी कानपूरमध्ये जन्मलेला कुलदीप सध्या खराब फार्ममधून जात आहे. चायनामन म्हणून प्रसिद्ध असलेला कुलदीप काही काळापासून संघातून बाहेर आहे. पण पुनरागमन कसे करायचे हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. यापूर्वीही तो या टप्प्यातून गेला आहे आणि एका क्षणी तो इतका निराश झाला होता की त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने स्वतः एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 13 वर्षांचा असताना 15 वर्षांखालील संघात खेळायचे होते. पण संघात निवड न झाल्याने निराश झालो होतो. त्यावेळी आत्महत्या करण्याचा विचारही मनात आला होता, असे त्याने सांगितले. एका वाहिनीवरील मुलाखतीत त्याने बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. 15 वर्षांखालील संघात निवड व्हावी, यासाठी खूपच मेहनत घेतली होती. पण निवड झालीच नाही. खूप निराश झालो होतो. आत्महत्येचा विचारही केला होता. पण वडिलांनी निराशेतून बाहेर काढले, असे त्याने सांगितले.

  2014 नंतर नशीब बदलले

  देशांतर्गत क्रिकेटसोबतच तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) वतीने चमकला आणि यासोबतच टीम इंडियाचे दरवाजेही त्याच्यासाठी उघडले. कुलदीपने 2014 मध्ये आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेतली होती. भुवनेश्वर कुमारनंतर सर्व फॉरमॅटमध्ये 5 बळी घेणारा कुलदीप यादव हा दुसरा भारतीय आहे. 18 डिसेंबर 2019 रोजी, वेस्ट इंडिजविरुद्ध, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. कुलदीपने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने 7 कसोटी सामन्यात 26, 65 एकदिवसीय सामन्यात 107 बळी आणि 23 टी-20 सामन्यात 41 बळी घेतले. त्याने या वर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये शेवटचा सामना खेळला. एकदिवसीय आणि टी-20 मध्ये, तो जुलैपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, तर कसोटीतील शेवटचा सामना या वर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला गेला.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Kuldeep yadav

  पुढील बातम्या