IPL 2019 : कृणाल पांड्याला मिळणार बॉलीवुडचं तिकीट, 'या' अभिनेत्यानं दिली सिनेमाची ऑफर

IPL 2019 : कृणाल पांड्याला मिळणार बॉलीवुडचं तिकीट, 'या' अभिनेत्यानं दिली सिनेमाची ऑफर

आयपीएलमधून एका खेळाडूची वर्णी थेट बॉलीवूडमध्ये लागणार आहे. पण त्याला कोणी दिली ही ऑफर

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : आजवर सुनील गावस्कर, अजय जडेजा, विनोद कांबळी, कपिल देव यांसारख्या क्रिकेटपटूंनी आपल्या खेळाबरोबरच अभिनयातही आपलं नशीब आजमावलं. यात एकाही खेळाडूला यश आले नसले तरी, जाहिरातींमधून क्रिकेटपटू आपल्याला दिसत असतात. पण याता आयपीएलमधून एका खेळाडूची वर्णी थेट बॉलीवूडमध्ये लागणार आहे. हा खेळाडू आहे, मुंबईकर कृणाल पांड्या.

कृणाल सध्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. पण आयपीएल संपन्याआधीच कृणालला सिनेमाची ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर दिली आहे बॉलीवुडचा सिंघम अजय देवगण यानं. ते झालं असं की, नुकतेच अजय देवगणनं आपल्या पन्नाशीत पदार्पण केले. दरम्यान त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी कृणालं त्याला शुभेच्छा दिल्या. कृणालनं दिलेल्या या शुभेच्छांचा स्विकार करत अजय देवगणनंही त्याला, माझ्यासोबत डबल रोलची भूमिका असलेला सिनेमा करशील का? अशी ऑफरही दिली.

अजय देवगणच्या या ऑफरचा कृणालनं लगेचच स्विकार केला, पण त्यानं अजयला एक अट घातली. ती अट म्हणजे, कृणालनं अजयला मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी वानखेडेवर यावे, असे सांगितले. दरम्यान मागच्या सामन्यात मुंबईनं चेन्नईचा विजयरथ रोखला, आणि मुंबईनं घरच्या मैदानावर गड राखला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा हा शंभरावा विजय ठरला. आतापर्यंत एकाही संघाला अशी कामगिरी करणं जमलेलं नाही आहे.

VIDEO: राहुल गांधींनी पुण्याच्या ईशाला दिली लोकसभेची ऑफर

First published: April 5, 2019, 1:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading