वडिलांच्या मृत्यूनंतर कृणाल पांड्या धक्क्यात, सोशल मीडियावर लिहिली हृदयद्रावक पोस्ट

वडिलांच्या मृत्यूनंतर कृणाल पांड्या धक्क्यात, सोशल मीडियावर लिहिली हृदयद्रावक पोस्ट

टीम इंडियाचे ऑल राऊंडर हार्दिक (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांचे वडिल हिमांशू पांड्या यांचं निधन झालं.

  • Share this:

बडोदा, 19 जानेवारी : टीम इंडियाचे ऑल राऊंडर हार्दिक (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांचे वडिल हिमांशू पांड्या यांचं निधन झालं. हृदयविकाराचा धक्का लागल्यामुळे हिमांशू पांड्या यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाचं नेतृत्व करणारा कृणाल पंड्या बायो-बबलमधून बाहेर पडून वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी बडोद्याला परतला. दोन्ही भावांनी सोमवारी वडिलांचा अत्यंविधी केला.

वडिलांच्या मृत्यूनंतर कृणालनी आपल्या दिवंगत वडिलांना इन्स्टाग्रामवर एक भावनिक पत्र लिहिलं आहे. वडिल आणि दोन्ही मुलांमधील संबंधांचं प्रतिबिंब या पत्रात पडलेलं दिसतंय. कृणाल मोठा आणि हार्दिक लहान, या दोघांनीही या आधी अनेकदा आपल्या वडिलांचं माध्यमांसमोर तोंड भरून कौतुक केलं आहे.

कृणालचं भावुक पत्र

'प्रिय पप्पा, तुम्ही आमच्यासाठी काय आहात, हे सांगायला 100 पुस्तकही कमी पडतील. तुमच्यामुळेच आम्ही या उंचीपर्यंत पोहोचलो आहोत. तुम्ही आता आमच्यामध्ये नाही, हे स्वीकारणंही मला कठीण जात आहे. खूप साऱ्या चांगल्या आठवणी सोडून तुम्ही गेलात, मी जेव्हा तुमचा विचार करेन तेव्हा या आठवणींमुळे मी नेहमीच हसेन. आम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलीत. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलात, तसंच स्वत:वरही विश्वास ठेवायला शिकवलंत. तुमच्यासोबत भांडायला, तुम्हाला त्रास द्यायला, तुमच्यासोबत गॉसिप करायला मजा यायची. स्पर्धेसाठी जाण्याआधी आपण घराच्या खाली फोटो काढला, ही आपली शेवटची भेट असेल, हे हे मलाही माहिती नव्हतं. तुम्ही मला सोडून गेलात, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. ही पोकळी कशी भरून काढायची, हे मला कळत नाही. पण तुमचं आयुष्य मी सेलिब्रेट करेन, कारण तुम्ही आयुष्य जगलात. तुम्ही माझ्यासोबत कायम राहाल. हे घर तुमच्याशिवाय तसं कधीच नसेल. आम्हीही आता तुमच्याशिवाय तसेच नसू, पण तुम्ही जिकडे असाल तिकडून आम्हाला बघत असाल, जसे इकडेही आमच्याकडे लक्ष ठेवायचात. आयुष्याबद्दल खूप गोष्टी शिकवल्याबद्दल धन्यवाद. आमचा तुम्हाला अभिमान वाटेल, असंच आम्ही वागू. ढोसा मला तुमची कायमच आठवण येईल. माझे रॉकस्टार आणि माझे शिक्षक'

कृणालच्या या पोस्टला अनेकांनी पसंती दिली आहे. आतापर्यंत 4 लाख 63 हजारांहून अधिक जणांनी ही पोस्ट पाहिली आहे. तसंच ही पोस्ट व्हायरलही होत आहे.

First published: January 19, 2021, 10:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या