मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : विक्रमी खेळीनंतर कृणाल भाऊ हार्दिकच्या मिठीत ढसाढसा रडला

IND vs ENG : विक्रमी खेळीनंतर कृणाल भाऊ हार्दिकच्या मिठीत ढसाढसा रडला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या कृणाल पांड्याने (Krunal Pandya) धमाकेदार बॅटिंग करत विक्रमाला गवसणी घातली. यानंतर कृणालला अश्रू अनावर झाले आणि त्याने भाऊ हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) जाऊन मिठी मारली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या कृणाल पांड्याने (Krunal Pandya) धमाकेदार बॅटिंग करत विक्रमाला गवसणी घातली. यानंतर कृणालला अश्रू अनावर झाले आणि त्याने भाऊ हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) जाऊन मिठी मारली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या कृणाल पांड्याने (Krunal Pandya) धमाकेदार बॅटिंग करत विक्रमाला गवसणी घातली. यानंतर कृणालला अश्रू अनावर झाले आणि त्याने भाऊ हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) जाऊन मिठी मारली.

  • Published by:  Shreyas

पुणे, 23 मार्च : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या कृणाल पांड्याने (Krunal Pandya) धमाकेदार बॅटिंग करत विक्रमाला गवसणी घातली. कृणालने 31 बॉलमध्ये नाबाद 58 रनची खेळी केली, यात 7 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. 26 बॉलमध्येच कृणालने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. आपल्या पहिल्याच वनडेमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम कृणाल पांड्याच्या नावावर झाला आहे. ही विक्रमी खेळी केल्यानंतर कृणाल भाऊ हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मिठी मारून ढसाढसा रडला. काहीच दिवसांपूर्वी कृणाल पांड्याच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या आठवणीने कृणालला अश्रू अनावर झाले.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच वनडेमध्ये भारताकडून कर्नाटकचा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि बडोद्याचा ऑलराऊंडर कृणाल पांड्याचं (Krunal Pandya) पदार्पण झालं आहे. प्रसिद्ध कृष्णाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच आहे, तर कृणाल पांड्याची ही पहिलीच वनडे मॅच आहे. कृणाल याआधी भारताकडून टी-20 क्रिकेट खेळला आहे. कृणाल आणि प्रसिद्ध यांनी नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली होती. याच कामगिरीमुळे त्यांची वनडे टीममध्ये निवड झाली.

पहिल्या वनडेआधी कृणालला त्याचा छोटा भाऊ हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) वनडे कॅप दिली. भावाकडून कॅप घेताना कृणाल पांड्या भावुक झाला. ही कॅप त्याने आकाशाला दाखवली आणि आपल्या वडिलांची आठवण काढली. याचवर्षी जानेवारी महिन्यात हार्दिक आणि कृणालचे वडील हिमांशू पांड्या (Himanshu Pandya) यांचा मृत्यू झाला होता.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) त्रिपुराविरुद्ध कृणालने 97 बॉलमध्ये 127 रनची खेळी केली होती, तेव्हाही कृणालला वडिलांची आठवण आली होती. लिस्ट-ए करियरमधलं कृणालचं हे पहिलंच शतक होतं, पण हे पाहण्यासाठी त्याचे वडील जिवंत नव्हते, त्यामुळे कृणाल भावुक झाला. 'मी पहिल्यांदाच शतक केलं, पण ते पाहण्यासाठी वडील नाहीत. वडील या जगात नाहीत, याचा विचार करूनही मन भरून येतं. पण त्यांनी माझी ही खेळी नक्कीच बघितली असेल आणि ते खूश झाले असतील. कृणाल शाबास, असंही ते म्हणाले असतील. माझी ही खेळी मी त्यांना समर्पित करतो,' असं कृणाल म्हणाला होता.

'मी जेव्हा जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या मॅचमध्ये 76 रन केले होते, तेव्हा माझं आणि वडिलांचं बोलणं झालं होतं. तुझी वेळ आता सुरू झाली आहे, असं ते म्हणाले. हे माझं आणि त्यांचं शेवटचं बोलणं होतं. त्याचा अर्थ आता मला समजत आहे,' अशी प्रतिक्रिया कृणालने दिली.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्याचं नेतृत्व करणाऱ्या कृणालने 5 मॅचमध्ये 388 रन केले आणि 5 विकेट घेतल्या. तर दुसरीकडे प्रसिद्ध कृष्णानेही भारतीय टीममध्ये संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हा क्षण कायमच माझ्या लक्षात राहिल. देशाकडून क्रिकेट खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, असं कृष्णा म्हणाला.

प्रसिद्ध कृष्णा कर्नाटककडून स्थानिक क्रिकेट खेळतो. 150 किमी प्रती वेगाने बॉलिंग करण्याची त्याची क्षमता आहे. विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही प्रसिद्ध कृष्णाने चांगली कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये तो कोलकात्याकडून खेळतो. 2015 साली कृष्णा पहिली प्रथम श्रेणी मॅच खेळला, पण या फॉरमॅटमध्ये त्याचं रेकॉर्ड फारसं चांगलं नाही, त्यामुळे त्याला फक्त 9 प्रथम श्रेणी मॅच खेळण्याची संधी मिळाली. कृष्णाने 48 लिस्ट ए मॅचमध्ये 23 च्या सरासरीने 81 विकेट घेतल्या आहेत. तर 40 टी-20 मॅचमध्ये त्याला 35 च्या सरासरीने 33 विकेट घेता आल्या. कृष्णाने आयपीएलमध्येही 24 मॅचमध्ये 18 विकेट घेण्यात यश मिळवलं.

First published:

Tags: Hardik pandya, India vs england, Krunal Pandya