Home /News /sport /

6 बॉलमध्ये 6 सिक्स, 436 च्या स्ट्राईक रेटने ठोकले 83 रन, भारतीय क्रिकेटरच्या वादळी खेळीचा VIDEO

6 बॉलमध्ये 6 सिक्स, 436 च्या स्ट्राईक रेटने ठोकले 83 रन, भारतीय क्रिकेटरच्या वादळी खेळीचा VIDEO

16 वर्षांचा क्रिकेटर कृष्णा पांडे (Krishna Pandey) याने 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारण्याचा कारनामा केला आहे. कृष्णा पांडेने हे रेकॉर्ड स्थानिक टी-10 लीगमध्ये केलं आहे.

    मुंबई, 7 जून : 16 वर्षांचा क्रिकेटर कृष्णा पांडे (Krishna Pandey) याने 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारण्याचा कारनामा केला आहे. कृष्णा पांडेने हे रेकॉर्ड स्थानिक टी-10 लीगमध्ये केलं आहे. या रेकॉर्डनंतर कृष्णा पांडे युवराज सिंग, रवी शास्त्री आणि कायरन पोलार्ड यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पण या तिघांनी टॉप लेव्हल क्रिकेटमध्ये हा विक्रम केला होता. टी-10 फॉरमॅटचा सिक्सर किंग कृष्णा टी-10 फॉरमॅटचा पहिला सिक्सर किंग झाला आहे. टी-20 मध्ये हा विक्रम युवराज सिंग आणि कायरन पोलार्ड यांच्या नावावर आहे. या दोघांच्याआधी रवी शास्त्री यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना 6 बॉलला 6 सिक्स मारले होते. वनडे फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जने सगळ्यात आधी हे रेकॉर्ड केलं. 2007 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडच्या वॉन्ग बुंगेच्या ओव्हरमध्ये गिब्जने सहा सिक्स मारल्या. 12 सिक्सनंतरही टीमचा पराभव शनिवारी पॉन्डेचेर टी-10 लीगमध्ये रॉयल्न पेट्रियट्सवर 4 रनने रोमांचक विजय मिळवला. पहिले बॅटिंग करत त्यांनी 157 रन ठोकले, रघुपतीने 30 बॉलमध्ये नाबाद 84 रनची खेळी केली. पेट्रियट्सकडून एस परमेश्वरनने 25 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पेट्रियट्सची सुरूवात खराब झाली. पाच ओव्हरमध्येच त्यांनी 3 विकेट गमावल्या होत्या, कृष्णा पांडेने वादळी खेळी केली आणि 19 बॉलमध्ये 436.80 च्या स्ट्राईक रेटने 83 रन केले. त्याच्या या खेळीमध्ये 12 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. यात 6 बॉलमध्ये सिक्सही होत्या. जडेजानेही केला होता विक्रम स्थानिक क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजानेही एक ओव्हरमध्ये 6 सिक्स मारल्या होत्या. डिसेंबर 2016 साली सौराष्ट्र क्रिकेट लीगच्या इंटर डिस्ट्रिक्ट टी-20 स्पर्धेत नीलम वाम्जाच्या एका ओव्हरमध्ये त्याने सहा सिक्स ठोकल्या होत्या.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या