कोलकाता, 12 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामाचे ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच दर दिवशी सामन्यांमध्ये एक वेगळीच रंगत पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेवटच्या चेंडूंपर्यंत रंगणाऱ्या सामन्यांमध्ये कित्येकदा रात्रीचे 12 वाजून जातात. याबाबत आता खेळाडूच तक्रार करु लागले आहेत.
कोलकाताचा फिरकीपटू कुलदीप यादवनं एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलमध्ये उशीरापर्यंत चालणारे सामने हे त्रासदायक असतात. त्याचा आम्हाला त्रास होते, असं व्यक्तव्य केलं होतं. त्यामुळं कुलदिपनं सामने लवकर संपवा अशी विनंती खेळाडूंना केली आहे.
कुलदीपच्या मते, कधीकधी आम्हाला 3 दिवसांत 2 सामने खेळायचे असतात अशावेळी विश्रांती मिळत नाही. त्यात एक सामना घरच्या मैदानावर असेल, तर दुसऱ्या सामन्यासाठी इतर शहरात जावं लागतं. यामध्ये प्रवास आला, त्यामुळे एका क्षणानंतर तुमचं शरीर थकून जातं. त्यातच आयपीएलनंतर लगेचच विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे, अशावेळी सामन्यांचं आयोजन अधिक काटेकोर पद्धतीने व्हायला हवं, असंही कुलदीप म्हणाला. कुलदीप यादवने आपली बाजू मांडली.
दरम्यान याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं खेळाडूंवर अतिक्रिकेटमुळे येणाऱ्या ताणाबद्दल भीती व्यक्त केली होती. तर विश्वचषकाच्या आधी खेळाडू दुखापतग्रस्त होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे.
याआधी भारतीय संघातील संभाव्य खेळाडूंना आयपीएलच्या संघ मालकांनी पुरेशी विश्रांती द्यावी असे आदेश बीसीसीआयनं दिले होते. मात्र, बीसीसीआयचे आदेश संघ मालकांकडून आणि खेळाडूंकडून पाळले जात नसल्याचे चित्र दिसत आहे.
...आणि कांचन कुल यांना आमदारसाहेबांनी घेतलं उचलून, VIDEO व्हायरल