S M L

कोलकाताचा दिल्लीवर दणदणीत विजय

कोलकाता नाईट रायडर्सने 201 धावांचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 129 धावांवर खुर्दा पडला

Sachin Salve | Updated On: Apr 16, 2018 11:48 PM IST

कोलकाताचा दिल्लीवर दणदणीत विजय

16 एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्सने 201 धावांचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 129 धावांवर खुर्दा पडला. कोलकाताने तब्बल 71 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

टाॅस का बाॅस ठरत दिल्लीने पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण कोलकाताच्या टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय म्हणजे विजय हे समिकरण मोडीत काढलं.  केकेआरने ९ गडी गमवत २० षटकांमध्ये २०० धावा केल्या. कोलकाता टीमकडून नितेश राणाने सर्वाधिक 59 धावा केल्यात. त्याच्यापाठोपाठ अद्रे रसल 41, राॅबीन उथपा 35 आणि ख्रिस लेयन 31 धावा केल्या. निर्धारित 20 षटकात केकेआरने 201 धावा कुटल्यात.

२०१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. कर्णधार गौतम गंभीर अवघ्या 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर जेसन राॅय 1, श्रेयस अय्यर 4 धावा करून झटपट बाद झाले. रिशभ पंत आणि मॅक्सवेलने टीमची कमाल सांभाळण्याची प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. रिशभ पंत 43 आणि मॅक्सवेलने 47 धावा केल्यात. त्यानंतर कोणताही खेळाडू केकेआरच्या समोर तग धरू शकला नाही. अवघा संघ 129 धावांवर गारद झाला. केकेआरने आयपीएलच्या हंगामातला सर्वात मोठा विजय मिळवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 11:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close