S M L

पुण्याला हरवून कोलकाता आयपीएलमध्ये अव्वल स्थानी

8 पैकी 6 मॅच जिंकून 12 पाँईट मिळवत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे

Sachin Salve | Updated On: Apr 26, 2017 11:53 PM IST

पुण्याला हरवून कोलकाता आयपीएलमध्ये अव्वल स्थानी

26 एप्रिल :  गौतम गंभीर आणि राॅबिन उथप्पाच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर कोलकाता नाईटरायडर्सने रायझिंग पुणे सुपरजायंटवर 7 विकेटस राखून पराभूत केलंय.

पुणे सुपरजायंटने पहिली बॅटिंग करत 182 रन्सचा डोंगर उभा केला. पण कोलकाता टीमकडून गौतम गंभीर 62 तर राॅबिन उथप्पा 87 रन्सची तडाखेबाज बॅटिंग करत विजय मिळवून दिला.

कोलकाताने 18.1 ओव्हरमध्ये 184 रन्स करत विजय मिळवला.

पुणे सुपरजायंटने पहिली बॅटिंग केली. पुण्याकडून कॅप्टलन स्टीव स्मिथने शानदार अर्धशतकी खेळी केली पण ती व्यर्थ ठरली.

कोलकाताचे फक्त 3 गडी बाद झाले. पण गौतम गंभीरने 46 बाॅल्समध्ये 6 चौकार एक सिक्स लगावत 62 रन्स करून आऊट झाला. तर उथप्पा 7 चौकार आणि 6 सिक्स लगावत शानदार 87 रन्सची खेळी करून विजयाचा मार्ग मोकळा करू दिला. त्यानंतर ब्रावो आणि मनिष पांडेने विजयाची औपचारीकता पूर्ण केली.

Loading...
Loading...

8 पैकी 6 मॅच जिंकून 12 पाँईट मिळवत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्सनेही इतक्याच मॅच जिंकल्या आहेत पण पाँईटच्या आधारावर ती दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 11:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close