S M L

राहुल त्रिपाठीची झुंजार खेळी, पुण्याचा कोलकातावर 4 विकेट्सने विजय

राहुल त्रिपाठीने तुफान फटकेबाजी करत 51 बाॅल्समध्ये 93 रन्स ठोकले

Sachin Salve | Updated On: May 4, 2017 12:04 AM IST

राहुल त्रिपाठीची झुंजार खेळी, पुण्याचा कोलकातावर 4 विकेट्सने विजय

03 मे : राहुल त्रिपाठीच्या शानदार खेळीच्या बळावर रायझिंग पुणे सुपरजायंटने कोलकाता नाईट रायडर्सचा 4 विकेटने पराभव केलाय. मात्र, राहुल त्रिपाठीची सेंच्युरी मात्र हुकली.

राहुल त्रिपाठीने तुफान फटकेबाजी करत 51 बाॅल्समध्ये 93 रन्स ठोकले. राहुलने 9 चौकार आणि 7 सिक्स लगावत धडाकेबाज इनिंग पेश केली. मात्र 18.4 व्या ओव्हरमध्ये स्टोक्सच्या बाॅलवर राहुल आऊट झाला. अवघ्या 7 रन्सने त्याची सेंच्युरी हुकली.

तर अजिंक्य रहाणे 11 रन्स करून आऊट झाला. कॅप्टन स्टीव स्मिथही 9 रन्सवर आऊट झाला. मनोज तिवारी 8 रनवर आऊट झाला. कोलकाताने पहिली बॅटिंग करत 156 रन्सचं टार्गेट दिलं होतं. पुण्याच्या भेदक माऱ्यापुढे कोलकाताची टाॅप आॅर्डर कोसळली. 156 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पुणे टीमने अखेरच्या ओव्हरमध्ये 5 विकेट राखून विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 12:03 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close