S M L

कोलकाता 'जितबो रे', दिल्लीवर शानदार विजय

गौतम गंभीर आणि राॅबिन उथप्पाच्या शानदार खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेविल्सला 7 विकेट्सने पराभूत केलंय

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2017 07:56 PM IST

कोलकाता 'जितबो रे', दिल्लीवर शानदार विजय

28 एप्रिल : गौतम गंभीर आणि राॅबिन उथप्पाच्या शानदार खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेविल्सला 7 विकेट्सने पराभूत केलंय. गौतम गंभीरने नाबाद 71 रन्सची खेळी करत आयपीएलमध्ये 4 हजार रन्स पूर्ण केले.

पहिली बॅटिंग करणाऱ्या दिल्ली डेअरडेविल्सने 6 विकेटवर 160 रन्स केले. याला उत्तर देत कोलकाता टीमने 18.3 ओव्हरमध्ये 161 रन्स करत मॅच खिश्यात घातली.

गौतम गंभीरने 52 बाॅल्समध्ये 11 चौकार आणि 4 सिक्स लगावत नाबाद 71 रन्स केले. तर राॅबिन उथप्पाने 33 बाॅल्समध्ये 5 चौकार आणि 4 सिक्स लगावत 59 रन्स केले.कोलकाता टीमने आपल्या होमग्राऊंडवर ही 12 वी मॅच जिंकलीये. केकेआर आता पाँईटटेबलमध्ये टाॅपवर असून प्लेआॅफमध्ये त्यांचं स्थान पक्क आहे.

गौतम गंभीरचा रेकाॅर्ड

गौतम गंभीरने आज नाबाद 71 रन्सची खेळी करत 6 हजार टी -20 आणि 4 हजार आयपीएल रन्स पूर्ण केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 07:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close