मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: केकेआर घेणार मोठा निर्णय, ‘या’ दोन दिग्गजांना मिळणार डच्चू?

IPL 2021: केकेआर घेणार मोठा निर्णय, ‘या’ दोन दिग्गजांना मिळणार डच्चू?

दोन वेळेसचे आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) पुढील मोसमासाठी टीममध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.

दोन वेळेसचे आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) पुढील मोसमासाठी टीममध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.

दोन वेळेसचे आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) पुढील मोसमासाठी टीममध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.

मुंबई, 11 जानेवारी : दोन वेळेसचे आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) पुढील मोसमासाठी टीममध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. IPL 2021 साठी पुढच्या महिन्यात लिलाव होण्याची शक्यता आहे. त्या लिलावाच्यापूर्वी दोन बड्या खेळाडूंना KKR डच्चू देण्याची शक्यता आहे.

कोणत्या खेळाडूंवर टांगती तलवार?

कोलकाताला मागील दोन आयपीएल स्पर्धेची प्ले ऑफ गाठण्यात अपयश आलं आहे. या अपयशानंतर कोलकाताची टीम त्यांचा माजी कॅप्टन दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांना वगळण्याची शक्यता आहे.

दिनेश कार्तिक 2018 साली टीममध्ये दाखल झाला होता. तर कुलदीप 2014 पासून कोलकाताकडं आहे. या दोन्ही खेळाडूंनी मागील काही मोसमात समाधानकारक कामगिरी केलेली नाही. त्याचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. ‘इनसाईड स्पोर्ट्स’नं हे वृत्त दिलं आहे.

दिनेश कार्तिक 2018 आणि 2019 मध्ये केकेआरचा कॅप्टन होता. तर मागील सिझनमध्ये त्यानं सात मॅचनंतर कॅप्टनसी सोडली होती. त्यानंतर इंग्लंडच्या इयन मॉर्गन (Eoin Morgan) केकेआरचा कॅप्टन बनला. कुलदीप यादवचा फॉर्म गेल्या दोन वर्षामध्ये घसरला आहे. त्याला 2019 च्या आयपीएलमध्ये 9 मॅचमध्ये फक्त 4 विकेट्स मिळाल्या होत्या. तर 2020 च्या आयपीएलमध्ये त्याला फक्त 5 मॅचमध्ये संधी मिळाली. कार्तिक आणि कुलदीपला वगळल्यास कोलकाताकडे 13 कोटींची शिल्लक जमा होईल.

दिनेश कार्तिकच्या जागी टॉम बँटन आणि निखिल नाईक हे विकेट किपरचे पर्याय कोलकाताकडं आहेत. तर कुलदीप ऐवजी सुनील नरीन, वरुण चक्रवर्ती, टॉम बँटन असा स्पिन अ‍ॅटॅक केकेआरकडं आहे.

कमिन्सवर निर्णय नाही

कोलकाताचा मागील सिझनमधील महागडा खेळेडू पॅट कमिन्सबाबत टीमनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. कमिन्सला 15 कोटी 50 लाख रुपयांच्या विक्रमी किंमतीवर कोलकातानं खरेदी केलं होतं. मात्र त्याची मागील आयपीएलमधील कामगिरी साधारण होती. आयपीएलसाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करण्याची तारीख 21 जानेवारी आहे. त्यानंतर 4 फेब्रुवारीपर्यंत ट्रेडिंग विंडो सुरु असेल.

First published:
top videos

    Tags: Cricket