IPL 2020 : IPLआधीच कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूवर बंदी!

IPL 2020 : IPLआधीच कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूवर बंदी!

IPLच्या तेराव्या हंगामाआधीच शाहरुख खानच्या संघाच्या अडचणी वाढल्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जानेवारी : IPLच्या तेराव्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणी वाढल्या आहे. आयपीएल लिलावात विकत घेतलेल्या दिग्गज खेळाडूवर एका वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं हा खेळाडू आयपीएलचा 13 वा हंगाम खेळू शकणार नाही आहे. हा खेळाडू फिरकीपटू प्रवीण तांबे.

कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल लिलावात प्रवीण तांबेला 20 लाखांच्या बेस प्राईसवर विकत घेतले होते. आयपीएलच्या लिलावात विकला जाणारा तांबे हा सर्वात वयस्कर खेळाडू होता. मात्र त्याच्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे कोलकाताच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

वाचा-सचिनचा आदर्श पण फलंदाजी धोनीसारखी, 16 व्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये खेळणार

आयपीएल 13मध्ये प्रवीण तांबेवर बंदी घालण्यात आली आहे, कारण त्याने गेल्या वर्षी अबूधाबी आणि शारजाह येथे टी 10-लीगमध्ये भाग घेतला होता. तांबेने या स्पर्धेत हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. मात्र भारतात खेळत असताना खेळाडू इतर स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत नाही. त्यामुळं टी-10 स्पर्धा खेळल्यामुळं प्रवीण तांबेवर बंदी घालण्यात आली आहे.

वाचा-क्रिकेट खेळण्यासाठी व्हावं लागलं होतं 'मुलगा', आता 15व्या वर्षी खेळणार वर्ल्ड कप

प्रवीण तांबेनं टी-10 स्पर्धेत इयॉन मॉर्गन, केरन पोलार्ड आणि फॅबियन एलन सारख्या दिग्गजांचा बाद केले हते. इतकेच नाही तर या तिघांशिवाय त्यांनी ख्रिस गेल आणि उपुल तरंगालाही बाद केले होते. त्यामुळं हा दिग्गज खेळाडू खेळू न शिकल्याचा तोटा केकेआर संघाला नक्कीच होऊ शकतो.

वाचा-दिल्ली कॅपिटल्सचे 4.80 कोटी वसूल, IPLआधीच खेळाडूनं 79 चेंडूत केल्या 147 धावा!

आयपीएलमध्ये सर्वाधिक वयात पदार्पण कऱणाऱ्या मुंबईच्या प्रवीण तांबेंवर यावेळीही बोली लागली. कोलकाता नाइट रायडर्सने या खेळाडूला संघात घेतले. वयाच्या 41 व्या वर्षी 2011 साली तांबेंनी आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 01:12 PM IST

ताज्या बातम्या