कोलकाताचा चेन्नईवर 'सुपर' विजय

कोलकाताचा चेन्नईवर 'सुपर' विजय

  • Share this:

03 मे : कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सचा विजय रथ रोखत शानदार विजय मिळवलाय. कोलकाताने सहा गडी राखून चेन्नईचा पराभव केलाय.

ईडन गार्डनवर कोलकाताने टाॅस जिंकून पहिले गोलंदाजाची निर्णय़ घेतला. चेन्नईने पहिली बॅटिंग करत 20 षटकात 177 धावा केल्यात. कोलकात्यासमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य होतं. कोलकाता टीमने 17.4 षटकार 180 धावा करून सहज विजय मिळवला.

कोलकाताकडून ओपनर क्रिस लिन 12 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोबिन उथप्पाही झटपट बाद झाला. त्यानंतर  दिनेश कार्तिक आणि शुभम गिलने दमदार फलंदाजी करत कोलकाता टीमला विजय मिळवून दिला. दिनेशने नाबाद 45 आणि शुभमने नाबाद 57 धावांची खेळी केली.

चेन्नईकडून कर्णधार महेंद्र सिंग धोनीने सर्वाधिक 43 धावा केल्यात. शेन वाॅटसन 36 तर सुरेश रैनाने 31 धावांची खेळी केली होती.

First published: May 3, 2018, 11:59 PM IST

ताज्या बातम्या