विराटला श्रीलंका वनडे सीरिजसाठी विश्रांती देण्याची शक्यता

विराटला श्रीलंका वनडे सीरिजसाठी विश्रांती देण्याची शक्यता

कॅप्टन विराट कोहलीला वन-डे आणि टी-२० सीरिजसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

27 नोव्हेंबर : श्रीलंकेविरुद्धची तिसरी कसोटी,वन-डे सीरिज,टी-२० सीरिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आज भारतीय टीमची निवड होणार आहे. कॅप्टन विराट कोहलीला वन-डे आणि टी-२० सीरिजसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.

आयपीएलपासून विराट सलग क्रिकेट खेळतोय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वपूर्ण दौऱ्या अगोदर विराटला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे टीमचं नेतृत्व येईल. पण सगळ्यांच्या नजरा असतील त्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर. जसप्रित बुमराह, कुलदीप यादव आणि चहल यांच्यापैकी कुणाल निवडकर्ते संधी देतात ते बघावं लागेल.

आर.आश्विन आणि रविंद्र जडेजा यांची निवड निश्चित मानली जातेय. तर शिखर धवन,के.एल.राहुल, मुरली विजय, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मोहम्मद शामी, ईशांत शर्मा,उमेश यादव आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दीक पंड्या यांची निवड निश्चित मानली जातेय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी १७ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

First published: November 27, 2017, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading