बंगळुरू, 6 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपला पहिला विजय मिळवण्यासाठी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला अजुनही यश आलेले नाही. दरम्यान बंगळुरू संघानं एका पाठोपाठ एक असे हाताशी आलेले पाच सामने गमावले. शुक्रवारी झालेल्या कोलकता विरुद्धचा सामनाही विराटनं असाच गमावला. याविषयी कोहलीनं आता स्पष्टीकरण देत, आपल्या पराभवाची कारणं सांगितली.
विराटनं शुक्रवारी झालेल्या सामन्यानंतर, सलग पाच पराभवांचे खापर गोलंदाजांवर फोडले आहे. विराटच्या मते, ''या मागे कोणा एका माणसाला दोषी ठरवू शकत नाही. आम्ही या हंगामात आयपीएलच्या दर्जाचं क्रिकेट खेळलो नाही. त्यामुळं आम्हाला सलग पाच पराभव पत्करावे लागले. पण कोलकता विरोधातला सामना हा आमचाच होता. पण आंद्रे रसेलनं केलेली फलंदाजी अश्विसनीय होती. पण गोलंदाजांना शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करता आली नाही, हे सत्य आहे'', असे सांगितले.
Kohli slams RCB bowlers after fifth consecutive defeat
— ANI Digital (@ani_digital) April 6, 2019
Read @ANI story | https://t.co/ypYm7sVRzD pic.twitter.com/hwmAea3L8q
कोलकाता विरुद्धच्या सामन्यात आरसीबीनं चांगली सुरूवात करत, 206 धावांचे आव्हान कोलकाता संघाला दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या 16 षटकांत 4 बाद 140 धावा झाल्या होत्या. त्यानंतर 17 व्या षटकात आंद्रे रसेलने केलेल्या तुफान फटकेबाजीने सामना केकेआरने जिंकला. आरसीबीचा यंदाच्या आयपीएलमधील हा सलग पाचवा पराभव आहे.
सामन्यातील 17 व्या षटकात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मोहम्मद सिराजने हे षटक टाकले. पहिलाच चेंडू फुल टॉस टाकला. त्यावर रसेलला एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही रसेल धाव काढू शकला नाही. तिसऱा चेंडू टाकताना सिराजने बाऊन्सर टाकला. मात्र तो वाइड ठरला. यावेळी पंचांनी सिराजला ताकीद दिली होती. एकदा ताकीद दिल्यानंतरही तिसऱ्या चेंडूवर पुन्हा बाउन्सर टाकल्याने सिराजला नो बॉल दिला. या चेंडूवर रसेलने षटकार ठोकला. त्यानंतर पंचांनी त्याला पुढचं षटक टाकता येणार नसल्याचे सांगत त्याबद्दल विराटला कल्पना दिली. उर्वरीत षटक टाकण्यासाठी चेंडू स्टोइनसकडे सोपवला, त्या चेंडूवरही रसेलने षटकार ठोकला. हा चेंडूच सामन्याला कलाटणी देणारा ठरला.
सामन्यातील 19 व्या षटकात तब्बल 29 धावा कुटल्या. पहिल्या चेंडूवर शुभमन गिलने एक धाव काढली. त्यानंतर स्ट्राइकला आलेल्या रसेलनं अक्षरश: धुलाई केली. पुढच्या सलग तीन चेंडूवर षटकार मारले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार मारला. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एक षटकार खेचत या षटकात 29 धावा काढत बरोबरी साधली. शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवर एक धाव काढून केकेआरने विजय मिळवला. रसेलने 13 चेंडूत 1 चौकार आणि 7 षटकारासह 48 धावा केल्या आणि बंगळुरूनं सामना गमावला.
VIDEO: माझं नाव आफताब जहाँ, पण मला 'हा' मराठमोळा लुक भारी आवडतो